Nashik News : तर्क लावताना मिनिटभर विचार करायला लावणारे प्रश्न, विकल्पांची फोड करताना त्यातून दिलेले पर्याय अशा स्वरूपाच्या प्रश्नांनी उमेदवारांची चांगलीच परीक्षा घेतली. मंगळवारी (ता. १८) यूजीसी-नेटची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने शहरातील तीन केंद्रांवर पार पडली. सुमारे साडेतीन हजार परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली होती. (Second Paper Of UGC NET exam 2024 was tough)
दरम्यान, पेपर क्रमांक- २ ची काठीण्यपातळी अधिक राहिल्याचे बहुतांश विद्यार्थ्यांनी सांगितले. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’तर्फे जून व डिसेंबर अशा दोन सत्रांमध्ये यूजीसी-नेट परीक्षा घेतली जाते. आतापर्यंत ही परीक्षा संगणकावर आधारित (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) अशा स्वरूपात घेतली जात होती. त्यामुळे एकापेक्षा जास्त दिवस व दैनंदिन स्वरूपात दोन सत्रांमध्ये ही परीक्षा व्हायची.
परंतु आता या परीक्षा पद्धतीत बदल करताना यूजीसी-नेट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. राष्ट्रीय पातळीवर सहाय्यक प्राध्यापक व पीएच.डी. पात्रतेसाठी घेतलेल्या या परीक्षेसाठी परीक्षार्थींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. नाशिकमध्ये तीन केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी साडेतीन हजार परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली होती. उपस्थितीचे प्रमाण नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त राहिल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात आले.
दोन सत्रांमध्ये झालेल्या या परीक्षेत पेपर क्रमांक एक फारसा कठीण वाटला नाही. परंतु विषयांवर आधारित असलेला पेपर क्रमांक दोनची काठिण्य पातळी अधिक राहिल्याचे बहुतांश परीक्षार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे वेळेत पेपर सोडविणे आव्हानात्मक राहिल्याचे परीक्षार्थ्यांचे म्हणणे होते. (latest marathi news)
‘त्या’ विद्यार्थ्यांना सुटी
शहरातील तीन शाळांत ही परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली होती. शनिवारी (ता. १५) शाळांना सुरवात झालेली असताना, लागलीच रविवार (ता. १६) ची सार्वजनिक सुटी, सोमवारी (ता. १७) बकरी ईदची सुटी आणि पुन्हा मंगळवारी (ता. १८) सुटी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला होता.
तीनशे गुणांसाठी दोन पेपर
यंदा ऑफलाइन परीक्षा घेतली असली तरी पेपरच्या रचनेत मात्र बदल केलेला नव्हता. त्यामुळे पूर्वीप्रमाणे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले. पेपर क्रमांक एकमध्ये शंभर गुणांसाठी पन्नास प्रश्न आणि पेपर क्रमांक दोनमध्ये दोनशे गुणांसाठी शंभर प्रश्न अशी तीनशे गुणांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. ८३ विषयांसाठी ही परीक्षा घेतली गेली.
"यूजीसी-नेट परीक्षेतील पेपर क्रमांक दोनची काठिण्य पातळी अधिक राहिल्याचे बहुतांश परीक्षार्थ्यांचे म्हणणे होते. सहजासहजी सोडविता येणार नाहीत व काहीसा विचार करायला लावणारे असे कठीण प्रश्न यंदा विचारले गेले. त्यामुळे आता निकाल पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे." - प्रा. डॉ. देवीदास गिरी, नेट-सेट परीक्षा मार्गदर्शक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.