Nashik News : गणेशवाडीतील भाजी मंडईकडे विक्रेत्यांची पाठ! लोखंडी दारांसह ग्रील्स, संरक्षक जाळ्या झाल्या गायब

Latest Nashik News : मंडईतील संरक्षक जाळ्या, लोखंडी ग्रील्स, अँगल लांबविण्यात आले आहेत. मंडईचा वापर स्वच्छतागृहासारखा होत असल्याने दुर्गंधीही पसरली आहे.
Mandai taken over by beggars
Mandai taken over by beggarsesakal
Updated on

Nashik News : गणेशवाडी येथील झोपडपट्टी उठवून व तब्बल पाच सहा कोटी खर्चून भाजी मंडई बांधण्यात आली. मात्र सुरवातीपासूनच विक्रेत्यांनी मंडईकडे पाठ फिरविल्याने सध्या ती चोरट्यांचे ‘लक्ष्य’ ठरत आहे. मंडईतील संरक्षक जाळ्या, लोखंडी ग्रील्स, अँगल लांबविण्यात आले आहेत. मंडईचा वापर स्वच्छतागृहासारखा होत असल्याने दुर्गंधीही पसरली आहे. (Sellers negligence to vegetable market in Ganeshwadi)

२००२-०३ च्या कुंभमेळ्यापूर्वी गोदाघाटावर साईबाबा मंदिरासमोरील भाजी बाजार पोलिस बळाचा वापर करून हटविण्यात आला. त्यानंतर या विक्रेत्यांसाठी गाडगे महाराज पुलाशेजारी भव्य भाजी मंडई उभारली. मात्र, विक्रेत्यांनी व्यवसाय करण्यास नकार दिल्यापासून ती वापराविना पडून आहे.

सध्या मंडईच्या काही भागात फूल बाजार भरतो, तरीही मोठ्या भागाचा ताबा भिकारी, गर्लुल्ले यांच्याकडेच आहे. येथील विक्रेतेही या जागेचा वापर स्वच्छतागृहासारखा करत असल्याने बकालपणात वाढ झाली आहे. मंडईच्या संरक्षणासाठी काहीकाळ खासगी सुरक्षारक्षकही नेमले होते.

काही काळाने सुरक्षारक्षक गायब झाले, तेव्हापासून मंडई लोखंडी दरवाजे चोरट्यांनी गायब केले. त्यानंतर वरील भागातील लोखंडी ग्रील्स, लोखंडी संरक्षक कठडेही चोरट्यांनी काढून नेले. भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी मोठ्या संख्येने ओटे बनविले. या ओट्यांचे पुरापासून संरक्षण व्हावे, म्हणून त्यांच्या चारही बाजूला लोखंडी अँगल बसविले. (latest marathi news)

Mandai taken over by beggars
Maharashtra Assembly Election: भाजपचा राज्यातही ‘हरियाना पॅटर्न’! मराठेतरांच्या मेळाव्यांचा आधार

परंतु यातील बहुतांशी अँगल चोरट्यांनी ओटे फोडून लांबविले, त्यामुळे या ओट्यांना विद्रूप स्वरूप प्राप्त झाले आहे. सध्या लोखंडी जाळ्या बसविण्याचे काम सुरू झाले आहे, परंतु सुरक्षारक्षक न नेमल्यास काही दिवसांतच या जाळ्याही चोरट्यांकडून गायब होण्याची शक्यता आहे.

"जनतेच्या कराच्या पैशातून उभारलेल्या या मंडईकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येथील दरवाजे, लोखंडी ॲन्गल, लोखंडी कठडे चोरट्यांकडून गायब केले जातात. सुरक्षारक्षकाची नेमणूक करणे गरजेचे आहे."- उल्हास धनवटे, माजी नगरसेवक

"येथील लोखंडी अँगल, ग्रील्स, संरक्षक जाळ्या चोरट्यांनी गायब केल्या आहेत. या जागेला लोखंडी कुंपण करण्याचे काम सुरू आहे. मात्र सुरक्षारक्षक नसल्याने या संरक्षक जाळ्याही चोरट्यांचे लक्ष्य ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंडईच्या संरक्षणासाठी चोवीस तास सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी."- नारायणराव पवार, व्यावसायिक

Mandai taken over by beggars
Tree Enumeration : वृक्षगणनेसाठी 10.34 कोटीच्या खर्चाला मंजुरी! नव्याने वृक्षसंपदा मोजणार; 50 लाख वृक्षांचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.