Nashik Lok Sabha Election: दिनकर पाटील यांची लोकसभेसाठी फिल्डिंग जोरात! 20 मंडलाध्यक्षांनी समर्थन दिल्याची सूत्रांची माहिती

Nashik Latest News : भाजपाचे ज्येष्ठ नेते दिनकर धर्माजी पाटील हे लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहेत, हे सर्वश्रूत आहे.
Dinkar Patil
Dinkar Patilesakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : भाजपाचे ज्येष्ठ नेते दिनकर धर्माजी पाटील हे लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहेत, हे सर्वश्रूत आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रत्यक्ष संपर्क अभियान राबवत असलेले पाटील हे तसे गेल्या २०१४ पासून लोकसभेच्या मैदानात आहेत. भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांपासून ते दिल्लीतील वरिष्ठांपर्यंत पाटील यांचा संपर्क आहे.(Nashik Senior BJP leader Dinkar Patil preparation for Lok Sabha Election)

विशेष म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघांतर्गत भाजपाच्या २० मंडलाध्यक्षांनी पाटील यांच्या समर्थनार्थ वरिष्ठांना पत्र पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. एखाद्या लोकसभा मतदार संघात अशी बाब भाजपामध्ये प्रथमच घडली असावी, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

दिनकर पाटील हे सातपूर भागातील बहुश्रुत असलेले व्यक्तिमत्त्व आहे. संपूर्ण मतदार संघात त्यांचे नातेगोते मोठ्या प्रमाणात आहे. अनेक समाजोपयोगी कार्यात त्यांनी सतत पुढाकार घेतलेला आहे.

आता लोकसभेसाठी ते मुक्तपणे मतदार संघात फिरत आहेत. आजवर संपूर्ण मतदार संघातील प्रत्येक गावाला त्यांनी किमान तीनवेळा भेट दिलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत त्यांच्या कामाची पावती पोचलेली आहे. 

मंडलाध्यक्षांनी दिलेले समर्थन चर्चेचा विषय ठरतेय. तसेच वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथानेही दिनकर पाटील यांच्या पाठिंब्यासाठी उघड भूमिका घेतली आहे. पाटील यांना भाजपाने उमेदवारी दिल्यास देशभर भाजपाला साथ देऊ, असे या दोन्ही पंथांच्या प्रमुखांनी भाजपा श्रेष्ठींना लेखी पत्रासह प्रत्यक्ष भेट घेऊन कळविले आहे. 

Dinkar Patil
Nashik News : वीरजवान राकेश काकुळतेंना साश्रुनयनांनी निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पाटलांचा विरोध कशासाठी?

दिनकर पाटील यांना भाजपातील एका गटाकडून विरोध आहे. या विरोधामागील सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे पाटील मोठे झाल्यास त्याचा स्थानिक नेत्यांच्या प्रभाववाढीवर मर्यादा येवू शकतात. पाटील यांचा लोकसभा मतदारसंघातील संपर्क दांडगा आहे.

अनेक धार्मिक, आध्यात्मिक कार्यांना ते सढळ हस्ते मदत करत असतात. कुस्त्यांच्या दंगलीच्या आयोजनाने त्यांनी मोठा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे. आत्ताच त्यांना रोखल्यास भविष्यातील स्पर्धक तयार होणार नाहीत, या नियोजनात काही स्थानिक नेते मग्न आहेत. 

विचार न झाल्यास डॅमेज

भाजपाने दिनकर पाटील यांचा विचार न केल्यास पक्षाला डॅमेज होईल, एवढे काम संपर्काच्या माध्यमातून पाटील यांनी उभे करुन ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य कुणाचा विचार करायचा झाल्यास पाटील यांना कसे समजावायचे, हा मोठा प्रश्न भाजपासमोर असेल.

मोठा चाहता वर्ग निर्माण केलेला असल्याने त्यांचा विचार न केल्यास पक्षाला डॅमेज होऊ शकेल, अशी स्थिती निर्माण करण्यात त्यांना यश आलेले आहे.

Dinkar Patil
Nashik Police Transfer: सोहन माछरे सातपूरचे ‘प्रभारी’! आयुक्तांची नाराजी भोवली; नलावडेंना झटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.