Nashik News : राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये ‘अंनिस’चा स्वतंत्र कक्ष! ‘अंनिस’कडून स्वागत; 'महाराष्ट्र पोलीस’चे पाऊल पथदर्शी

Nashik News : भारतात प्रथमच जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र पोलिसांनी उचललेले पाऊल पथदर्शी मानल जात असून महाराष्ट्र अंधश्रदधा निर्मूलन समितीने याचे स्वागत केले आहे.
maharashtra police & anti superstition committee
maharashtra police & anti superstition committeeesakal
Updated on

Nashik News : महाराष्ट्रातील पोलीस ठाण्यांमध्ये अंधश्रदधा निर्मूलनाचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे, तसे आदेशच कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी जारी केले आहेत. भारतात प्रथमच जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र पोलिसांनी उचललेले पाऊल पथदर्शी मानल जात असून महाराष्ट्र अंधश्रदधा निर्मूलन समितीने याचे स्वागत केले आहे. (Separate room of anti superstition committee in police stations of state)

‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३’ या कायद्याची प्रभावी अंमलबजावण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने सदरचा निर्णय घेतला आहे.

अंनिसने सलग १८ वर्षे सातत्याने विविध आंदोलने, लढे उभे केले होते. संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर शासनाने हा कायदा संमत केला. केंद्र सरकारने जादूटोणा विरोधी कायदा करावा, यासाठी संघटना पाठपुरावा करते आहे. (latest marathi news)

maharashtra police & anti superstition committee
Aditya Thackeray : नागरिकांचे झालेले नुकसान भरून निघेल का? आदित्य ठाकरे यांचा सरकारला प्रश्न

महाराष्ट्र पोलीस दलाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, महेंद्र दातरंगे, राज्य सदस्य प्रल्हाद मिस्त्री, राजेंद्र फेगडे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. शामसुंदर झळके, जिल्हा प्रधान सचिव नितीन बागुल, महेंद्र दातरंगे, ॲड समीर शिंदे, प्रा. आशा लांडगे, कोमल वर्दे, अरूण घोडेराव यांनी केले आहे.

असा असेल कक्ष

जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त तर, पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात स्थानिक गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती असेल. तसेच या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी करीता प्रत्येक पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र कक्ष स्थापन करावा, असे कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी पत्रान्वये कळविले आहे.

maharashtra police & anti superstition committee
Paris Olympic 2024: 'सिटी ऑफ लव्ह' पॅरिसमध्ये बॉयफ्रेंडबरोबर फिरणं स्विमरला पडलं महागात; ऑलिम्पिक व्हिलेजमधूनच काढलं बाहेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.