Simhastha kumbh Mela : सिंहस्थ आराखड्याच्या नाना तऱ्हा! अंतिम हात फिरविताना गंभीर चुका

Nashik News : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेकडून शासनाला सादर करावयाच्या विकास आराखड्यावर अंतिम हात फिरविताना पुन्हा एकदा गंभीर चुका आढळल्या आहे.
Simhastha Kumbh Mela
Simhastha Kumbh Mela esakal
Updated on

Nashik News : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेकडून शासनाला सादर करावयाच्या विकास आराखड्यावर अंतिम हात फिरविताना पुन्हा एकदा गंभीर चुका आढळल्या आहे. यात काही विभागांकडून मराठीत तर काही विभागांकडून इंग्रजीत अहवाल प्राप्त झाले. (serious mistakes were found in development plan)

काही विभागांनी मराठीत प्रकल्पांची नावे टाकताना आकडे मात्र इंग्रजीत दिल्याने आराखड्यातील विस्कळितपणा दूर करण्याच्या कानपिचक्या आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी विभाग प्रमुखांना दिल्या. नाशिकला २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या निमित्ताने तीन वर्ष अगोदरच मनपा प्रशासनाकडून कुंभमेळा नियोजनाची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.

नाशिक महापालिकेच्यावतीने अकरा हजार कोटींचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला. त्याचबरोबर सिंहस्थसाठी कायमस्वरूपी भूसंपादनासाठी पाच हजार कोटी रुपये व स्वतंत्ररीत्या ५६ किलोमीटरचे दोन बाह्य रिंग रोड विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित करण्यात आले.

सदरचा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाला सादर करण्याची वेळ आली असतानाच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी वास्तवदर्शी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी देखील विकास आराखड्यात आवश्‍यक कामांचा समावेश करण्याची मागणी केली. (latest marathi news)

Simhastha Kumbh Mela
Nashik Encroachment : विधीमंडळातील लक्षवेधीनंतर अतिक्रमण कारवाई! शहरातील 2 हजार 791 अतिक्रमण धारकांना नोटिसा

त्यानंतर आयुक्त डॉ. करंजकर यांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन प्रस्तावित कामांची पाहणी केली. अनावश्यक कामे कपात करताना मिसिंग रोडला प्राधान्य दिले. सिंहस्थ आराखडा संदर्भात अंतिम बैठकीतून जवळपास सतरा हजार कोटी रुपयापर्यंतचे सिंहस्थ विकास आराखडा राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून मिसिंग लिंक तयार करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

महापालिकेकडून मिसिंग लिंकचे काम हाती घेतले जाणार आहे. मिसिंग लिंकसह दोनशे किलोमीटरचे रस्ते तयार केले जाणार आहे. यात सहा किलोमीटरच्या घाटांची डागडुजी केली जाणार आहे व दोन किलोमीटरचे घाट नव्याने बांधले जाणार आहेत.

मराठी, इंग्रजीची सरमिसळ

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाकडून अंतिम मंजुरी मिळण्यासाठी ३१ जुलैपर्यंत सर्व विभागांचा एकत्रित विभागीय आयुक्तांमार्फत राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्या कामकाजाची पद्धत लक्षात घेऊन आराखड्यावर अंतिम हात फिरविला जात असताना मराठी-इंग्रजीची सरमिसळ लक्षात आल्यानंतर एका साच्यात आराखडा बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Simhastha Kumbh Mela
Nashik News : मध्यप्रदेश सरकारकडून सीमेवरील नाके बंद!

सिंहस्थ कुंभमेळ्यात खर्चाचे नियोजन

विभाग खर्च (कोटीत)

बांधकाम ३,७५०

पाणी पुरवठा १०००

सांडपाणी व्यवस्थापन २,४९१

विद्युत १६७

घनकचरा व्यवस्थापन १५१

वैद्यकीय विभाग ५५५

आपातकालीन ३२

उद्यान ४१

आयटी जनसंपर्क १९

Simhastha Kumbh Mela
Nashik Junior Collage Admission : पहिल्‍या फेरीत 6 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश; दुसऱ्या फेरीची उद्यापासून प्रक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.