Nashik News : शैक्षणिक दाखल्यांचा ‘सर्व्हर डाऊन’! महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले

Nashik News : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे ऑनलाइन कामांची संख्या अचानकपणे वाढल्यामुळे सर्व्हर बंद पडलेले असताना आता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्‍यक दाखल्यांचा सर्व्हर डाऊन झाला आहे.
Server down
Server downesakal
Updated on

Nashik News : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे ऑनलाइन कामांची संख्या अचानकपणे वाढल्यामुळे सर्व्हर बंद पडलेले असताना आता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्‍यक दाखल्यांचा सर्व्हर डाऊन झाला आहे. दिवसभरात हाताच्या बोटावर मोजण्या इतके दाखले निकाली निघत असल्याने शेकडो दाखले प्रलंबित आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना रात्री काम करण्याची वेळ आली आहे. (Server down)

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली आहे. त्यामुळे जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेयर, उत्पन्नाचा दाखला आदी दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करताना सर्वर सातत्याने बंद होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया चालू असते.

काहीतरी करून अर्ज दाखल झाला तरी प्रशासन अधिकाऱ्यांच्या डेस्कवर तो वेळेत दिसत नाही. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तो दिसतो. त्यानंतर डेस्क -१, डेस्क-२ या प्रक्रिया पूर्ण करण्यात काही दिवस जात आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना हे दाखले मिळण्यास उशीर होत चालला आहे. (latest marathi news)

Server down
Nashik News : श्रावण तोंडावर आल्याने ‘नॉनव्हेज’ मागणीत मोठी वाढ; भाव वधारले

"कागदपत्रांच्या अपुर्ततेअभावी प्रवेश रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तथापि, शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली की, दरवर्षी सर्व्हर डाऊन होतो. गेल्या वर्षीदेखील याच स्वरूपाच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. यातून राज्य शासनाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे."

"विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही या दृष्टीने आम्ही वेळेत दाखला देण्याच्या प्रयत्नात आहोत. कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत." - भीमराज दराडे, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन

Server down
Nashik News : स्वेटरविक्रेत्या तिबेटींनी धरली उच्च शिक्षणाची कास; नाशिकमधील तिघे झाले डॉक्टर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.