Nashik Water Shortage : इगतपुरीतील वाड्यापाड्यात भीषण पाणी टंचाई; नागरिकांची खोल उंट दरीत पायपीट

Nashik Water Shortage :पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरीत एप्रिलमध्ये भीषण पाणी टंचाईला आदिवासी नागरिकांना सामोरे जावे लागत आहेत.
Women walking through the valley for drinking water.
Women walking through the valley for drinking water.esakal
Updated on

Nashik Water Shortage : पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरीत एप्रिलमध्ये भीषण पाणी टंचाईला आदिवासी नागरिकांना सामोरे जावे लागत आहेत. पावसाळ्यात सुमारे चार हजार मिमी पाऊस पडत असूनही पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे पाणी टंचाईच्या झळा आतापासूनच सुरु झाल्या आहेत. भावली धरणातून ३२ कोटी रुपये खर्चून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची पाइपलाइन घेतली आहे. (Nashik Severe water shortage in Baripada in Igatpuri marathi news)

मात्र तरीही इगतपुरी शहरात गेल्या पाच वर्षापासून आठवड्यातून तीन दिवसच पाणी पुरवठा केला जात आहे. नगरपरिषद हद्दीतील तळेगाव शिवारातील कातुरवाडी, वाघाचा झाप, मेंगाळ झाप या वस्तीमधील दोनशे ते अडीचशे लोकसंख्या वस्ती असलेल्या आदिवासी नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या वाडीच्या नागरिकांना थेट दोन किलोमीटर असलेल्या घाटनदेवी मंदिर समोरील खोल उंट दरीतील झऱ्यातील पाणी पिण्यासाठी आणावे लागत आहे.

पाइपलाइन नावालाच

शहरात होत असलेल्या पाणीटंचाईच्या पाश्‍र्वभूमीवर मागील वर्षी नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर नगरपरिषदेने फक्त पाइपलाइन केली. मात्र वर्ष उलटून गेले तरीही या पाइपलाइनला पाणी आलेच नाही..(latest marathi news)

Women walking through the valley for drinking water.
Nashik Water Shortage : सिन्नर तालुका अजूनही कोरडाठाकच; पावसावर केवळ 33 टक्के पेरणी

''आमचा पाडा ३० वर्षापासून नगरपरिषद हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र अद्याप ही आमच्याकडे नळ कनेक्शन जोडण्यात आलेले नाहीत. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत लोकप्रतिनिधी, नगरसेवक समस्या सोडविण्याचे आश्‍वासन देता.मात्र अद्यापही समस्या जैसे थे आहे.''- वासुदेव वाघ, स्थानिक

''शहरापासून हाकेच्या अंतरावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा तळेगावला डॅम आहे. या डॅममधून महामार्गावर असलेल्या अनेक पंचतारांकित हॉटेल व रिसॉर्ट यांना २४ तास पाणी पुरवठा केला जातो. मात्र आमच्या आदिवासी बांधवांवर नगरपरिषद अन्याय करत आहे.''- लकी जाधव, प्रदेश उपाध्यक्ष आदिवासी काँग्रेस.

Women walking through the valley for drinking water.
Nashik Water Shortage : पिंपळगाव (वा) ला 29 वर्षानंतर टॅंकर; 5 दिवसाआड पाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.