Nashik News : मुंबई नाका येथील रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठीची गटार गेल्या सहा वर्षापासून बंद आहे. यामुळे रस्त्यावरील पावसाचे पाणी थेट लोकवस्तीत शिरत आहे. येथील रहिवाशांना या समस्येला वारंवार तोंड द्यावे लागत आहे. अनेक वेळा संपर्क साधून व तक्रारी करूनही गटार स्वच्छ करण्यासाठी महामार्ग विभागाचे कुणीही फिरकलेले नाही. मुंबई नाक्याहून पाथर्डी फाट्याकडे जाताना नाशिक- मुंबई महामार्गावर १६१ क्रमांक पोलच्या बाजूला रस्त्यावरील साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी मोठी ट्रेन गटार करण्यात आलेली होती. ( Sewage water directly into citizens homes at mumbai naka )