नाशिक : शाडू माती मर्यादित संसाधन असल्याने ग्रंथ तुमच्या दारी, निसर्गयान आणि नाशिकमधील सामाजिक, शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नातून शाडू मातीचा पुनर्वापर व्हावा या हेतूने ‘शाडू माती रक्षक’ उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी शहरातील ५६ ठिकाणी शाडू माती संकलन केंद्र तयार करण्यात आले असून याठिकाणी मातीचे संकलन होणार आहे. उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. (Shadu Mati Collection Center at 56 locations in city)