Nashik News : ईशान्य भारतातील लोकांच्या अस्मिता त्यांच्या ट्राईबशी जोडल्या गेल्या आहेत. ते आपल्या ट्राईबच्या लोकांशी अत्यंत प्रामाणिक असतात. त्यामुळे तिकडे भाऊबंदकी नाही. तेथे कोणालाही आपल्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागत नाही, असे प्रतिपादन मुंबई दूरदर्शनचे माजी उपसंचालक व लेखक शाहू पाटोळे यांनी केले. (Nashik Shahu Patole statement marathi news)
डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत ते बोलत होते. मणिपुरच्या निमित्ताने ईशान्य भारत समजून घेताना या विषयावर त्यांनी व्याख्यानमालेतील १२२ वे पुष्प मंगळवारी (ता.२०) मु. शं. औरंगाबादकर सभागृहात गुंफले. यावेळी प्रा. डॉ. संजय सावळे, डॉ. ठकसेन गोराणे यांची उपस्थिती होती. पाटोळे म्हणाले की, ईशान्य भारतातील लोकांनी अजूनही त्यांची संस्कृती जपली आहे.
त्यांना कुणीही वेगळ म्हणू शकत नाही. तेथील गाव, जिल्हे हे जमातनिहाय आहेत. तेथे कोणीही लिडर नाही. गावातील सर्व निर्णय हे गावातील लोक मिळूनच घेतात, ते कधीही आपल्या ट्राईबच्या लोकांबाबत वाईट बोलत नाहीत. ईशान्य भारतात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला किमान चार ते पाच भाषा बोलता येतात. एकमेकांत कधीही भांडण होत नाहीत.
पोलिसांनी गोळीबार, लाठीचार्ज केल्याच्या घटनाही ऐकायला येणार नाहीत. कारण तेथे कुठल्याही प्रकारची भावकी अस्तित्वात नाही. मणिपुरच्या निमित्ताने ईशान्य भारत समजून घेताना त्यातील अनेक पैलू उलगडत आहेत, असे मत त्यांनी मांडले. श्यामला चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. स्वप्नील कुंभारकर यांनी वक्तांच्या परिचय तर मुकुंद दीक्षित यांनी संस्थेचा परिचय करून दिला. सचिन मालेगावकर यांनी आभार मानले. ( latest marathi news )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.