Nashik Shantigiri Maharaj : पंतप्रधान मोदींच्या प्रचारासाठी शांतिगिरी महाराज वाराणसीत

Nashik News : नाशिक लोकसभा निवडणुकीत राजकारणाची शुद्धीकरण मोहीम गाजविल्यावर महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज आता वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार कार्यात व्यस्त आहेत.
Meerut candidate Arun Govil came to meet Shantigiri Maharaj, who is campaigning for Prime Minister Narendra Modi.
Meerut candidate Arun Govil came to meet Shantigiri Maharaj, who is campaigning for Prime Minister Narendra Modi.esakal
Updated on

Nashik News : नाशिक लोकसभा निवडणुकीत राजकारणाची शुद्धीकरण मोहीम गाजविल्यावर महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज आता वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार कार्यात व्यस्त आहेत. याच प्रचारादरम्यान रामायणात प्रभू श्रीरामांची यशस्वी भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते, तसेच भारतीय जनता पक्षाचे मेरठ (उत्तर प्रदेश)चे लोकसभा उमेदवार अरुण गोविल यांनी शांतिगिरी महाराज यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. (Shantigiri Maharaj)

राजकारणात चांगल्या व्यक्तींनी यावे, यासाठी इतरांनाही प्रेरणा मिळावी म्हणून राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी कोणाच्याही दबावाला बळी न पडता शांतिगिरी महाराजांनी नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवली. निवडणुकीत अर्ज भरण्यापासून तर मतदान होईपर्यंत महाराज चर्चेत राहिले. महाराज सध्या वाराणसी येथे मोदींचा प्रचार करीत आहेत.

या वेळी प्रचारादरम्यान शांतिगिरी महाराजांची रामायणात प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते, तसेच भाजपचे मेरठ (उत्तर प्रदेश)चे लोकसभा उमेदवार अरुण गोविल यांनी भेट घेतली. श्री. गोविल यांनी शांतिगिरी महाराजांचे आशीर्वाद घेतले. या वेळी उपस्थित भाविकांनी गोविल यांना महाराजांच्या देशभक्तीविषयी माहिती दिली.

‘लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा’ असा विचार घेऊन जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी नाशिकची लोकसभा निवडणूक सत्यमार्गाने लढवली आणि गाजवलीही. निवडणुकीच्या प्रचाराच्या प्रारंभापासून तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शांतिगिरी महाराज सर्वथा चर्चेत राहिले. ना कुणाकडून पैशांची आशा, ना कुठला स्वार्थ, ना मतदारांना प्रलोभन... (latest marathi news)

Meerut candidate Arun Govil came to meet Shantigiri Maharaj, who is campaigning for Prime Minister Narendra Modi.
Nashik Lok Sabha Election : निकालाच्या उत्कंठेने नियोजनाची आखणी; उत्तर महाराष्ट्रातील जागांकडे लक्ष

महाराजांच्या शिलेदारांनी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून राजकारणाच्या शुद्धीकरण मोहिमेचा जोरदार प्रारंभ केला. यामुळे दूषित झालेल्या राजकारणात एका चांगल्या विचाराची ठिणगी टाकण्याचे महत्कार्य स्वामी शांतिगिरी महाराजांनी केले. भविष्यात या ठिणगीचे रूपांतर निश्चितच स्वार्थी विचारांना भस्मसात करून देशभक्तीचे विचार सर्वांमध्ये रुजतील, असा विश्वास महाराजांसह भक्तांना आहे.

दृढ निश्चय व निष्काम हेतू मनी ठेवून देशभक्तीसाठी जय बाबाजी भक्त परिवारातील ‘शांतिदूत’ घरोघरी पोहोचले. त्यांनी महाराजांचे देशभक्तिपर विचार मनामनांत पोहोचविले. महाराजांनी नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवली असली, तरी इतर राज्यभर त्यांनी महायुतीला मतदान करण्याचे संकेत दिले होते.

स्वामी शांतिगिरी महाराज सध्या उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील जगद्‍गुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रमात वार्षिक जपानुष्ठान सोहळा करतानाच राजकारणात चांगले व्यक्तिमत्त्व आले पाहिजे, टिकलेही पाहिजे व हिंदुत्वाच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ते प्रचार करीत आहेत. त्यासाठी वाराणसी येथील घराघरांत महाराजांचे शिष्यगण पोहोचत आहेत.

Meerut candidate Arun Govil came to meet Shantigiri Maharaj, who is campaigning for Prime Minister Narendra Modi.
Nashik Lok Sabha Code Of Conduct : आचारसंहितेत अडकली टंचाई आढावा बैठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.