Nashik News : आरक्षण मिळेपर्यंत दाढी- कटिंग न करण्याची प्रतिज्ञा; शरद नवले 6 महिन्यानंतरही ठाम

Nashik : जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही किंवा समान नागरी कायदा होत नाही. तोपर्यंत दाढी आणि कटिंग करणार नाही.
Sharad Navale
Sharad Navaleesakal
Updated on

Nashik News : जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही किंवा समान नागरी कायदा होत नाही. तोपर्यंत दाढी आणि कटिंग करणार नाही, अशी प्रतिज्ञा केलेले पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते शरद नवले सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नवले यांनी ही प्रतिज्ञा घेतली आहे. सुरवातीला नवले यांची ही बाब कुणीही गांभीर्याने घेतली नव्हती. मात्र आता सहा महिन्यानंतरदेखील ते आहे त्या प्रतिज्ञेवर ठाम असल्याने सर्वत्र त्यांची चर्चा सुरू झाली आहे. (Sharad Navale pledge of not cutting beard till reservation is received even after 6 months )

आरक्षण नसल्याने स्वतःचे नुकसान झाले आहे. मात्र किमान येणाऱ्या पिढ्यांना तरी शिक्षणात आणि नोकरीत त्याचा फायदा व्हावा आणि प्रत्येक भारतीयाला समान नागरी अधिकार मिळावे या भावनेतून ही प्रतिज्ञा केल्याचे ते सांगतात. मानव अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांनी अनेकांना आतापर्यंत मदतीचा हात दिला आहे.

दहा आंतरधर्मीय आणि सुमारे १७५ विवाह त्यांनी घडवून आणले आहेत. वर्षानुवर्षे अनेकांचे वादात असलेले जमीन आणि इतर संपत्ती विषयक वाद देखील त्यांनी सामोपचाराने मिटविले आहेत .त्यामुळे पाथर्डी गाव आणि पाथर्डी फाटा परिसरात त्यांच्या सामाजिक कार्याची नेहमीच चर्चा असते. (latest marathi news)

Sharad Navale
Nashik News : युवकांनो, सोशल मीडियावरील अपप्रचाराला बळी पडू नका : संजय कुलकर्णी

मात्र या आगळ्यावेगळ्या प्रतिज्ञेमुळे आता ते पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. पाथर्डी गाव हे नेहमीच राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक बाबतीत हटके काहीतरी करण्यासाठी नेहमीच प्रसिद्ध आहे. नवले यांचे नात्याने काका असणारे दिवंगत माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शिक्षण मंडळ सभापती के. के. नवले यांनीदेखील जोपर्यंत वालदेवी धरण होत नाही.

तोपर्यंत दाढी करणार नाही, धरणातील पाण्यानेच दाढी करेल, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. विशेष म्हणजे वालदेवी धरण झाल्यानंतरच समारंभपूर्वक त्या पाण्याने त्यांनी दाढी करून घेतली होती. संपूर्ण राज्यात त्यांच्या या प्रतिज्ञेची मोठी चर्चा झाली होती. शरद नवले यांच्या निमित्ताने दिवंगत के. के. नवलेंच्या त्या प्रतिज्ञेच्या आठवणींनादेखील आता उजाळा मिळाला आहे.

Sharad Navale
Nashik News : डासांच्या समस्येने जुने नाशिककर त्रस्त; उपाययोजनांची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.