Nashik Sharad Pawar : पंतप्रधानांच्या जातिवाचक भाषणांमुळे देशाचे एकसंधत्व धोक्यात; शरद पवार यांचे भाजपवर जोरदार टीकास्त्र

Nashik : पंतप्रधान मोदी जातीजातींमध्ये अंतर पाडण्याचे काम करत असल्याने देशांच्या एकसंधत्वाला धोका निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
Sharad Pawar speaking at a rally held on Wednesday to campaign for Bhaskar Bhagare, the Mahavikas Aghadi candidate for Dindori Lok Sabha.
Sharad Pawar speaking at a rally held on Wednesday to campaign for Bhaskar Bhagare, the Mahavikas Aghadi candidate for Dindori Lok Sabha.esakal
Updated on

Nashik News : देशाच्या सर्वोच्चपदी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात, धर्म, भाषा, प्रांत यावर चर्चा न करता देश एकसंध कसा राहील, यावर भाष्य करणे आवश्यक आहे. परंतु, पंतप्रधान मोदी यावर भाष्य न करता जातीजातींमध्ये अंतर पाडण्याचे काम करत असल्याने देशांच्या एकसंधत्वाला धोका निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये केला. (Sharad Pawar alleged that Prime Minister Modi is working to create gap between castes)

तसेच आदिवासी बांधवांना वनवासी म्हणून त्यांचाही अवमान भाजप करत असल्याचे त्यांनी सांगितले. दिंडोरी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ वणी (ता. दिंडोरी) येथील कर्मवीर रावसाहेब थोरात महाविद्यालयाच्य प्रांगणात बुधवारी (ता. १५) सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, डॉ. अमोल कोल्हे.

आमदार सुनील भुसारा, रोहित पवार, मेहबूब शेख, सक्षणा सलगर, नीतेश कराळे, हेमंत टकले, श्रीराम शेटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीषकुमार कोतवाल, रामदास चारोस्कर, प्रा. यशवंत गोसावी, कोंडाजीमामा आव्हाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे, गजानन शेलार, गोकुळ पिंगळे आदी उपस्थित होते.

सभेत श्री. पवार यांनी भाजपवर चौफेर टीकास्त्र डागले. ते म्हणाले, की देशाचे पंतप्रधान नाशिकमध्ये आले आणि नेहमीप्रमाणे भाषण केले. मोदी देशातील पहिले असे पंतप्रधान आहेत, जे देशात विविध जाती धर्मामधील ऐक्य निर्माण करण्याऐवजी अंतर कसे वाढेल, अशी भूमिका घेत आहेत. आज नाशिकच्या सभेत त्याची पुनरावृत्ती झाली. (latest marathi news)

Sharad Pawar speaking at a rally held on Wednesday to campaign for Bhaskar Bhagare, the Mahavikas Aghadi candidate for Dindori Lok Sabha.
Nashik News : प्लास्टिक कागद, ताडपत्रीच्या मागणी वाढ! गेल्यावर्षीच्या तुलनेत 35 टक्क्यांनी दर वधारले

पंतप्रधानांनी पाण्याविषयी बोलणे अपेक्षित असताना त्यांनी याविषयी चकार शब्दही काढला नाही. महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जात असेल म्हणून कदाचित त्यांची ही भूमिका असावी. पण राजकारण बाजूला ठेवून आपण लोकसभेच्या निवडणुकीनंतर नाशिकच्या पाण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे सामुहिकरीत्या प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काळ्या आईशी इमान राखणारा हा जिल्हा आहे. शेतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न या जिल्ह्यातील तरुण शेतकरी करत आहे. सह्याद्री संस्थेची आठवण होत आहे. या जिल्ह्याचा नावलौकिक अनेकांनी केला आहे. हा जिल्हा आदिवासींचा आहे.

Sharad Pawar speaking at a rally held on Wednesday to campaign for Bhaskar Bhagare, the Mahavikas Aghadi candidate for Dindori Lok Sabha.
Nashik NMC News : होर्डिंग्जधारकांना महापालिकेकडून ताकीद! मुंबईतील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन सतर्क

जल, जंगल या देशाची संपत्ती आहे. या तिन्ही संपत्तीचा मालक हा आदिवासी आहे. त्यांना वनवासी संबोधत भाजपने समस्त आदिवासींचा अवमान केल्याची टीकाही पवारांनी केली. जिल्ह्यातील कांदा व पाणीप्रश्‍न सोडवण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याचे भास्कर भगरे म्हणाले.

कांद्यावर शेतकऱ्यांना बोलू द्या

पिंपळगाव बसवंत येथील पंतप्रधानांच्या सभेत शेतकऱ्यांनी त्यांना कांद्यावर बोलण्याचा आग्रह धरला, तर शेतकऱ्यालाच सभेतून बाहेर काढले. शेतकऱ्यांना बोलू दिले पाहिजे होते. पण दडपशाहीमुळे शेतकऱ्यांचा आवाजही दाबला जातोय, अशा शब्दात जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली.

Sharad Pawar speaking at a rally held on Wednesday to campaign for Bhaskar Bhagare, the Mahavikas Aghadi candidate for Dindori Lok Sabha.
Nashik Educational News : जिल्ह्यातील शाळांमध्ये पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके; समग्र शिक्षा अभियान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.