Nationalist Congress Party President Sharad Chandra Pawar Sharad Pawar speaking at the farmers gathering held on Friday to mark the death anniversary of Malojirao Mogal.
Nationalist Congress Party President Sharad Chandra Pawar Sharad Pawar speaking at the farmers gathering held on Friday to mark the death anniversary of Malojirao Mogal.esakal

Nashik Sharad Pawar : मालोजीराव संकट काळातील लढवय्ये नेते : शरद पवार

Nashik News : मालोजीराव संकटकाळात धैर्याने लढणारे लढवय्ये नेते होते, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.
Published on

Nashik News : माझ्यासोबत निवडून आलेल्या ४० आमदारांपैकी जवळपास ३५ आमदार पक्ष सोडून गेले. पण मालोजीराव मोगल कायम माझ्यासोबत निष्ठावान म्हणून राहिले. संकटकाळात त्यांनी मला धैर्याने साथ तर दिलीच, शिवाय जिल्ह्यातील सर्व आमदार निवडून आणण्याची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली. मालोजीराव संकटकाळात धैर्याने लढणारे लढवय्ये नेते होते, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. (Nashik Sharad Pawar)

निफाडचे माजी आमदार (कै.) मालोजीराव मोगल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शुक्रवारी (ता. १९) चितेगाव फाटा (ता. निफाड) येथील कुलस्वामिनी लॉन्समध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे अध्यक्षस्थानी होते. दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, रयत शिक्षण संस्थेचे ॲड. भगीरथ शिंदे, माजी आमदार अनिल कदम, कल्याणराव पाटील, मारोतराव पवार, अंबादास बनकर, योगेश घोलप.

माणिकराव शिंदे, दीपिका चव्हाण, राजेंद्र डोखळे, ‘मविप्र’चे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, माजी सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक डॉ. सयाजी गायकवाड, पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या संचालिका अमृता पवार, संचालक गोकुळ गिते, गजानन शेलार, दिलीप मोरे, शिवा सुरासे, डॉ. भाऊसाहेब मोरे, गणेश गिते आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, की शेतीवर सदैव निष्ठा असलेल्या मालोजीरावांनी ‘निसाका’, जिल्हा सहकारी बँक व ‘मविप्र’ यांची संस्थात्मक उभारणी करून त्या कशा पद्धतीने चालविल्या जाऊ शकतात, याचा आदर्श नवीन पिढीसमोर घालून दिला. मालोजीरावांची सेवा, कर्तृत्व आणि त्यांनी घेतलेली भूमिका अविस्मरणीय आहे. त्यांचा हा वसा जपणारे राजेंद्र मोगल यांना साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. (latest marathi news)

Nationalist Congress Party President Sharad Chandra Pawar Sharad Pawar speaking at the farmers gathering held on Friday to mark the death anniversary of Malojirao Mogal.
Nashik Police : आयुक्तांचा दणका, प्रभारींच्या उचलबांगडी; काही थेट कंट्रोल रूममध्ये

श्रीराम शेटे म्हणाले, की निफाड सहकारी साखर कारखाना, ‘मविप्र’ व जिल्हा बॅंक यांसारख्या संस्थांमध्ये काम कसे करावे, याचा आदर्श मालोजीकाकांनी घालून दिला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीने नाशिक जिल्ह्याने महाविकास आघाडीसोबत असल्याचे दाखवून दिले. यापुढेही हा विश्‍वास कायम राहील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार भगरे, ॲड. शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. अशोक सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. (कै.) मालोजीकाका मोगल यांच्या नाती सई, जुई व राजवर्धिनी यांनी तयार केलेले स्केच शरद पवार यांना भेट देण्यात आले. जिल्ह्यातील शेतकरी व काकासाहेब मोगल मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

...अन् अण्णांचे झाले काका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी भाषणाची सुरवात व्यासपीठावरील नेत्यांच्या नावापासून केली. यात निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांचा अनिल बनकर असा उल्लेख त्यांच्याकडून अनावधानाने झाला. ‘बनकर’ असा उल्लेख होताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या; शेटे यांना मात्र ही चूक लक्षात न आल्याने त्यांनी भाषण पुढे सुरूच ठेवले. अण्णांचे काका झाले, अशी चर्चा मेळाव्यानंतर सुरू झाली. त्याचा अनेकांनी आपापल्या परीने अर्थ काढायला सुरवात केली आहे.

Nationalist Congress Party President Sharad Chandra Pawar Sharad Pawar speaking at the farmers gathering held on Friday to mark the death anniversary of Malojirao Mogal.
Nashik News : मद्यविक्रीचा परवाना देणारे ग्रामसेवक पाटील निलंबित! जि. प. ग्रामपंचायत विभागाची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.