Sharad Pawar Nashik Daura : हुकूमशाही राजवटीमुळे देशासह संविधान धोक्यात : शरद पवार

Sharad Pawar : देशाने आजवर अनेक सरकार पाहिले आहेत. वैचारिक दृष्टीने त्यांची वेगळी भूमिका होती. विकासाचा विचार होता म्हणून लोकशाही टिकली होती.
Sharad Pawar while speaking at the farmers meeting held at Niphad. Crowd in attendance
Sharad Pawar while speaking at the farmers meeting held at Niphad. Crowd in attendanceesakal
Updated on

Sharad Pawar Nashik Daura : देशाने आजवर अनेक सरकार पाहिले आहेत. वैचारिक दृष्टीने त्यांची वेगळी भूमिका होती. विकासाचा विचार होता म्हणून लोकशाही टिकली होती. अलीकडे सगळी परिस्थिती बदलली आहे. सरकार गॅरंटी कसली देतेय? रोजगार कमी झाला, शेतीमालाचे भाव पडले, कांदा, ऊस, द्राक्ष यांचे भाव गडगडण्याची गॅरंटी सरकार देते काय? दिलेले आश्वासन पाळले नाही त्याची गॅरंटी का घेत नाही? केवळ आश्वासने दिली, सगळीकडे हुकूमशाही सुरु आहे. (nashik Sharad Pawar statement of Due to dictatorial rule country marathi news)

देशात दहशत निर्माण केली जात असून देश व संविधान वाचवण्याची चिंता आहे. या देशाची घटना बदलण्याचा घाट घातला जात असून सामान्य माणसाचा अधिकार हिरावण्याचा प्रयत्न सुरु आहे. देशाला पर्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, फक्त साथ तुमची हवी आहे. बदलाची सुरुवात तुमच्यापासून करूया अशी साद माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी घातली. निफाड येथे आयोजित महाएकजुट सभेच्या मंचावरुन शरद पवार बोलत होते.

मंचावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. संजय राऊत, खा. अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, एकनाथ खडसे, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, कोंडाजी आव्हाड, राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, हेमंत टकले, आमदार सुनील भुसारा, जे. पी. गावित , नानासाहेब बोरस्ते, श्रीराम शेटे, माजी आमदार अनिल कदम, जयंत दिंडे, माजी आमदार कल्याणराव पाटील, विक्रम रंधवे, राजेंद्र मोगल, राजेंद्र बोरगुडे, पुरुषोत्तम कडलग, मेहबुब शेख ,गोकुळ पिंगळे ,माणिकराव शिंदे, आमदार नरेंद्र दराडे, दिलीप मोरे, नवनाथ बोरगुडे , शिवाजी बोरगुडे, अशोक ढवळे, सुधाकर बडगुजर आदींसह महाविकास आघाडी घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. (latest marathi news)

Sharad Pawar while speaking at the farmers meeting held at Niphad. Crowd in attendance
Nashik Sharad Pawar : अखेर तारीख ठरली! भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा या तारखेला एल्गार...

शरद पवार पुढे म्हणाले की, मी केंद्रात मंत्री असतांना दिड महिना पुरेल एवढा अन्नधान्य पुरवठा उपलब्ध आहे अशी फाईल आली त्यावर कृषीप्रधान देशात ही वेळ येणे ही दुर्देवी बाब होती. आयातदार देशाला निर्यातदार बनविले होते. यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली.

त्यांच्या व्यथा समजून घेतल्या आणि दिल्लीत जाऊन कर्जमाफी एक्काहत्तर हजार कोटी कृषीकर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला हे विसरता कामा नये, असेही पवार यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी जितेंद्र आव्हाड यांनी आमदार दिलिप बनकर यांच्या कार्यशैलीवर तोंडसुख घेतले. सामान्य कार्यकर्त्यावर सत्तेचा दबाव टाकून कारवाई केली जाते, जिल्हा बँकेच्या सत्तेतुन आमदार कोकाटे व आमदार बनकर यांनी बँक लुटली.

शरद पवारांचे नाव वापरुन बाजार समिती व इतर सत्तास्थाने मिळविले. त्यापेक्षा अनिल कदम हे कर्तृत्वाने सरस असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. खासदार अमोल कोल्हे यांनी कांदा निर्यातबंदीने सुमारे दोन हजार कोटींचा फटका शेतकऱ्यांना बसला असून सहा हजार देऊ करुन शेतकऱ्यांची चेष्टा सुरु आहे. सर्वत्र जाहीरातींचा मारा सुरु असून दिल्लीच्या इशाऱ्यावर नाचणारे नंदीबैल पाठविण्यापेक्षा वाघ पाठवा असे आवाहन त्यांनी केले.

Sharad Pawar while speaking at the farmers meeting held at Niphad. Crowd in attendance
Nashik Sharad Pawar : शरद पवारांच्या दौऱ्याची नाशिकपासूनच होणार सुरवात

जयंत पाटील यांनी यावेळी बोलतांना दहा वर्ष उलटुनही शेतकरी‌ कर्जमाफी नाही. शेतकरी कामगारविरोधी कायद्याद्वारे गळचेपी सुरु आहे. अशावेळी अब की बार चारशे पारच्या घोषणांनी जनेतेपुढे येणाऱ्यांना जागा दाखवा असे आवाहन केले. पेठ ग्रामीण रुग्णालयात आजच एका गरोदर मातेसह बाळाचा मृत्यु पुरेशा वैद्यकीय सुविधेअभावी झाल्याची बाब आपल्या भाषणातून उघड केली. असे मंत्रीपद कशासाठी ठेवायचे असा घणाघात पाटील यांनी डॉ. भारती पवार यांचा नामोल्लेख न करता केला.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो, गद्दारांचा नाही. मराठी माणसांचा इतिहास तेच सांगतोय की गद्दार लोकांना माफी नाही. महाराष्ट्र राज्यात परत हे सरकार येणार नाही ही आमची गॅरंटी आहे. बाळासाहेब ठाकरे नसते तर आज राममंदिर उभे राहिले नसते. निवडणूक आली की, नवीन जुमला तयार करायचा, द्राक्ष पंढरीत शेतकऱ्यांवर संकट आले तेव्हा कोणी आले नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार अनिल कदम यांनी शरद पवार हे निफाड व नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्याची माहिती असणारे शेतकऱ्यांचे हक्काचे नेते आहेत. त्यांच्यामुळे स्फुर्ती मिळते. यावेळी भास्कर भगरे ,दिलिप मोरे, राजेंद्र मोगल, जे. पी. गावित, विक्रम रंधवे, नानासाहेब बोरस्ते, कोंडाजी आव्हाड, श्रीराम शेटे यांची भाषणे झाली.

कार्यक्रमास मधुकर शेलार, साहेबराव ढोमसे, संजय कुंदे, प्रभाकर मापारी, सचिन गिते, जना्र्दन देवरे, सुनील निकाळे, विजय जाधव, सुधीर कराड, महेश पठाडे, खंडु बोडखे , गोकुळ गिते, पृथ्वीराज मोगल, जयवंत मापारी, पतिंग ढोमसे, शिवा ढोमसे, संदिप शिंदे, ॲड. प्रविण ठाकरे, ॲड. रामनाथ सानप, ॲड. प्रमोद आहेर, सोमनाथ पानगव्हाणे, सचिन खडताळे आदींसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले. सभास्थळी दुपारपासून उपस्थित असलेल्या लाल बावटा व लाल टोप्या परिधाण केलेल्या कार्यकर्त्यांनी जे. पी. गवित यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

Sharad Pawar while speaking at the farmers meeting held at Niphad. Crowd in attendance
Sharad Pawar Nashik Daura : शरद पवार आजपासून नाशिकमध्ये; लोकसभेचा कौल जाणून घेण्यासाठी 2 दिवस पक्ष पदाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.