सिन्नर : देशाचे काम चालवायचे असेल, तर ४०० खासदारांची गरज नाही. ३०० खासदारांवरही सरकार चालते, तरीही नरेंद्र मोदी पुन्हा पुन्हा ४०० खासदार निवडून आणायचे सांगत होते. कारण त्यांना घटनेत बदल करायचे होते. त्यामुळे सामान्य लोकांच्या अधिकारावर गदा आली असती, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (ता. १३) येथे केले. सिन्नर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांच्या प्रचारार्थ पंचायत समिती कार्यालयासमोर बुधवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. (Sharad Pawar statement on 400 mp are not needed to run work of country )