Nashik Sharan Animal NGO : शहरातील भटक्या प्राण्यांचे शरण संस्थेकडून पुनर्वसन

नाशिक शहरात सध्या निराधार प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रस्त्यावर फिरणारे भटके प्राणी हे लोकांच्या दृष्टीने समस्या होत आहेत.
Sharanya Shetty (President, Sharan Sanstha)
Sujata Atal (Members Refuge)
Sharanya Shetty (President, Sharan Sanstha) Sujata Atal (Members Refuge)esakal
Updated on

Nashik Sharan Animal NGO : नाशिक शहरात सध्या निराधार प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रस्त्यावर फिरणारे भटके प्राणी हे लोकांच्या दृष्टीने समस्या होत आहेत. अनेकवेळा अपघातात रस्त्यावरचे भटके प्राणी जखमी होतात तर काही अपप्रवृत्तीचे लोक प्राण्यांना जखमी करतात, अशाच प्राण्यांचे पुनर्वसन करून त्यांच्यावर यशस्वी वैद्यकीय उपचार करणारी शरण सामाजिक संस्था शहराच्या विकासात आपली सामाजिक भूमिका बजावत आहे. (Nashik Sharan Animal NGO Rehabilitation of stray animals in city marathi news)

२००२ साली स्थापन झालेली शरण ही सामाजिक संस्था रस्त्यावरच्या प्राण्यांची आई बनली आहे. रस्त्यावर जखमी झालेले कुत्रे, गाई, वासरे, बैल, घोडा, डुक्कर, गाढव यांना उचलून ही संस्था निवारागृहात घेऊन जाते. यासाठी या संस्थेने दोन ॲम्बुलन्स तयार केल्या आहेत. जखमी प्राणी, पक्षी यांच्यासाठी या संस्थेने हेल्पलाइन नंबर तयार केला आहे. फोन आल्यावर या संस्थेचे कार्यकर्ते विशिष्ट ठिकाणावर जाऊन तेथील जखमी प्राण्यांना उपचारासाठी घेऊन येतात.

त्यांच्यावर यशस्वी उपचार केल्यानंतर या प्राण्यांना पुन्हा त्यांच्या ठिकाणी सोडले जाते. यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावर विल्होळी येथील कचरा डेपोजवळ नाशिक महानगरपालिकेने शरण या संस्थेला भाड्याने जागा दिलेली आहे. दानशूरांच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर आणि सीएसआर फंडातून ही संस्था सध्या मुक्या प्राण्यांवर यशस्वी वैद्यकीय उपचार करते आहे.

यासाठी महिन्याला किमान तीन लाख रुपये खर्च संस्थेचे दाते उचलतात. गेल्या २१ वर्षांपासून माऊथ पब्लिसिटीद्वारे नाशिक शहरात संस्थेचे काम पोचलेले आहे, यासाठी शहरभर संस्थेचे वॉलेंटियर (मदतनीस) काम करतात. अनेक ठिकाणी मुक्या प्राण्यांवर होणारा अन्याय कायदेशीर मार्गे लढा देऊन सोडवला जातो. यासाठी संस्थेने दानशूर वकिलांची टीम कोर्टात लढण्यासाठी तयार ठेवली आहे. (latest marathi news)

Sharanya Shetty (President, Sharan Sanstha)
Sujata Atal (Members Refuge)
Atmaja NGO: आत्मजाकडून सावित्रीच्या तीनशे लेकींना शैक्षणिक आधार

पाळीव कुत्र्यांवर अनेकवेळा मालक शारीरिक इजा करतात, अनेकवेळा भटक्या गायी, बैल, वासरे यांना गुंगीचे इंजेक्शन देऊन त्यांची तस्करी केली जाते. कसायाकडे ही जनावरे कापण्यासाठी नेले जातात. या विरोधात शरण या संस्थेचे कार्यकर्ते सध्या जनजागृती करून जखमी प्राण्यांवर यशस्वी वैद्यकीय उपचार करीत आहेत.

संस्थेच्या निवारा शेडमध्ये सध्या गाई, वासरे, बैल, शेळी, कुत्रे, मांजरी, घोडा, गाढव, डुक्कर या प्राण्यांवर उपचार सुरू आहेत. यासाठी या संस्थेचे सदस्य शरण्या शेट्टी, शशिकांत शेट्टी, सुजाता अटल, ॲड. विजया माहेश्वरी, मानसी दिंडे, वरुण कौशिक, श्रीनिवास लाल, निहारिका निगम, शाहरुख पटेल हे झटत आहेत.

जखमी प्राणी दिसल्यास हेल्पलाइन - ९४०४७०२४३६, ९०२२६२२४३६

''लहानपणापासून वडील रविचंद्र भंडारी यांना मुक्या प्राण्यांची सेवा आवडायची. आमच्या घरी अनेक मांजरी, कुत्रे, पक्षी, पाळीव मासे असायचे. वडील हॉटेल व्यवसायात असल्यामुळे रोज रात्री त्यांच्यासाठी खाऊ आणायचे. मुलांप्रमाणेच वडिलांनी पाळीव प्राण्यांना जीव लावला. यातून लहानपणापासूनच मुक्या प्राण्यांची सेवा करण्याचे बाळकडू मला मिळाले. माणसांच्या बाजूने सर्व झटतात मात्र मुक्या प्राण्यांवर भूतदया दाखवायला हवी म्हणून संस्थेची स्थापना करून लोकजागृतीची चळवळ हाती घेतली.''- शरण्या शेट्टी (अध्यक्षा, शरण संस्था)

माणसाप्रमाणेच आम्ही निराधार प्राण्यांवर वैद्यकीय उपचार करून पुन्हा त्यांच्या ठिकाणी त्यांना सोडून देतो, यासाठी आम्ही कायमस्वरूपी दोन ॲम्बुलन्स ठेवल्या आहेत. प्राण्यांच्या उदरनिर्वाहाचा खर्च दानशूर लोकांच्या मदतीतून भागवतो. यासाठी आम्ही संस्थेचे सर्व पदाधिकारी पदरमोड करून प्राण्यांना जगवतो. जनजागृतीची ही एक लोकचळवळ आम्ही हाती घेतली आहे. यात लोक सहभाग मिळतो म्हणून हे काम अविरत सुरू आहे.''- सुजाता अटल (सदस्य शरण संस्था)

Sharanya Shetty (President, Sharan Sanstha)
Sujata Atal (Members Refuge)
Nashik Animal News : देवळालीत चोरट्यांकडून जनावरांची चोरी, पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडला प्रकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()