Nashik Lok Sabha Result : मविआच्या विजयात ‘सोशल नेटकऱ्यां’चा सिंहाचा वाटा! लोकसभा निकालानंतर नेटकरी टोचताहेत कान

Nashik News : यंदा सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी कॅम्पेन राबवून महाविकास आघाडीच्या विजयाच सिंहाचा वाटा उचलला हेही तितकेच खरे आहे.
MVA & social media
MVA & social mediaesakal
Updated on

Nashik Lok Sabha Result : यंदाची लोकसभेची निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत राहिली. तशीच धक्कादायक निकालांचीही नोंद इतिहासात राहणार आहे. विशेषत: सोशल मीडियावरील नेटकऱ्यांमुळेही निवडणूक अधिक चर्चेत आली हेही वास्तव नाकारता येणार नाही. सोशल मीडियाचा खुबीने वापर करीत २०१४ मध्ये भाजपाचे सत्ता हस्तगत केली.

यंदा त्याच सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी कॅम्पेन राबवून महाविकास आघाडीच्या विजयाच सिंहाचा वाटा उचलला हेही तितकेच खरे आहे. आता हेच सोशल मीडियावरील नेटकरी मविआच्या नेत्यांना या विजयाने हुरळून न जाता, त्याच जिद्दीने अन्‌ त्याच एकीने अवघ्या चार महिन्यावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत कानही टोचत आहेत. (Nashik share of social networks in maha vikas Aghadi victory)

यंदाची लोकसभेची निवडणूक ही एकीकडे अहंकार आणि हुकूमशाहीच्या दिशेने जाणाऱ्या सत्ताधारी आणि कमकुवत, दुबळ्या झालेल्या विरोधकांमध्ये होती. मात्र, ज्यांच्या ‘मतां’वर निवडणूक अवलंबून होती त्यांना सत्ताधार्यांनी गृहित धरले तर विरोधकांनी त्याच मतदारांना जागे करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यातही मोलाची भूमिका निभावली ती सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी.

सुमारे १४० कोटींच्या या देशात कोट्यवधींच्या हाती स्मार्टफोन आला आहे. या स्मार्ट फोनचा वापर करणारा प्रत्येक जण सोशल मीडियाशी जोडला गेला आहे. सोशल मीडियावर जसे अफवांचे पीक आहे, तसेच ‘दूध का दूध-पाणी का पाणी’ करण्याचीही क्षमता आहे.

त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या आयटी सेलचा कस लागला. तर, काही सोशल नेटकऱ्यांनी एकहाती धुराळा उडवून दिला. यात देशपातळीवर ध्रुव राठी याच्यासारख्या अनेकांची नावे आहेत. तीच परिस्थिती महाराष्ट्रातही आहे. राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या योजनांचा, दाव्यांची पोलखोल करतानाच अनेक नेटकऱ्यांनी नेत्यांना उघडे पाडले.

गेल्या दहा-पंधरा वर्षांतील त्या नेत्यांच्या मुलाखती, व्हिडिओ, भाषणे, आश्वासनांचे रिल्स बनवून राज्यभर राळ उठवून दिली. परिणामी त्याचा फायदा अनेक मतदार संघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना झालेलाच आहे. त्यामुळे या नेटकऱ्यांचा महाविकास आघाडीच्या विजयात सिंहाचाच वाटा आहे हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. (latest marathi news)

MVA & social media
Palghar Lok Sabha : डाॅ. सावरांच्या विजयाने पालघरमध्ये भाजपची वाढली ताकद; आता विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु

गांभीर्याने घेणार का?

निवडणूक झाली, निकाल लागले. जे नेटकऱ्यांना साध्य करायचे होते, ते झाले. आता हेच नेटकरी महाविकास आघाडीच्या नेत्यांना, विजयामुळे हुरळून न जाता, अवघ्या चार महिन्यांवर असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच जोमाने कामाला लागा. मतदारांना जागते ठेवा अन्यथा पुन्हा मतदार राजा व्याजासकट परतफेड करीत’ अशा शब्दात कानही टोचत आहेत.

काही नेटकऱ्यांचा रोख शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे अधिक आहे. ज्या चूका लोकसभा निवडणुकीत केल्या त्या विधानसभेवेळी टाळण्याचे आवाहन केले आहे. तर काही नेटकरी हे मविआच्या नेत्यांना न थांबता सारे राज्य पिंजून काढण्याचे आवाहन करीत आहेत. नेटकऱ्यांच्या या कानपिचक्यांना मविआचे नेते किती गांभीर्याने घेतात, हे काही दिवसात दिसेलही. पण हे नक्की, यापुढच्या काळात सोशल मीडियावरील नेटकऱ्यांची भूमिका महत्त्वाचीच राहणार यात शंका नाही.

MVA & social media
Latur Lok-Sabha Result : निलंगा मतदारसंघात वाढलेले मताधिक्य भाजपसाठी ठरणार धोक्याची घंटा;आगामी काळात नेत्यांसमोर मोठी आव्हाने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com