Nashik Wood Smuggling Case : वनविभागाच्या कारवाईच्या भीतीने ‘पुष्पा’चा गुजरातमधील शेठने गुंडाळला गाशा

Nashik News : अवैध खैर तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधार तथाकथित शेठ यांनी गुजरात मधील आपल्या फुलवाडी गावातून गाशा गुंडाळून फरार झाला आहे.
Khair wood smuggling (file photo)
Khair wood smuggling (file photo)esakal
Updated on

Nashik News : अवैध खैर तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधार तथाकथित शेठ यांनी गुजरात मधील आपल्या फुलवाडी गावातून गाशा गुंडाळून फरार झाला आहे. महाराष्ट्र गुजरातच्या सीमावर्ती भागात होत असलेल्या खैर तस्करीप्रकरणी वनविभागाने कारवाई करत तस्करी करणारा मुख्य संशयित नवसु लोहार ऊर्फ पुष्पा यास अटक केली होती. (Nashik Wood Smuggling)

वनविभागाने केलेल्या चौकशीत त्याचे गुजरातमधील कनेक्शन उघड झाले होते. त्यानंतर वनविभागाकडून या संशयितांचा शोध घेण्यास सुरवात झाली आहे. या चौकशी दरम्यान संशयित लोहार ज्या शेठ सोबत व्यवहार करायचा त्याची माहिती लागताच वनविभागाच्या पथकाने त्याचा माग काढला.

गुजरातमधील फुलवाडी (ता. धरमपूर, जि. वलसाड) येथे धाड टाकली. मात्र वनविभागाकडून कारवाई होणार असल्याची माहिती मिळताच शेठने आपला गावातील गाशा गुंडाळत पळ काढला. (latest marathi news)

Khair wood smuggling (file photo)
Nashik Police Recruitment : मैदानी चाचणीला महिलांची दमछाक! तृतीयपंथी उमेदवारांची दांडी

पहिल्यादांच कारवाई

खैर तस्करप्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरात वनविभागाकडून प्रथमच मोठ्या प्रमाणात खैर तस्करांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. यापूर्वी अशी कारवाई झालेली नव्हती.

तस्कर प्रकरणी मुख्य संशयित याला पकडण्यासाठी तीन पथकांमध्ये ३६ अधिकारी व कर्मचारी फुलवाडी गाव व परिसरात शोध घेत आहे. जंग जंग पछाडले मात्र शेठ काही हाती लागला नाही.

Khair wood smuggling (file photo)
Nashik District Bank : जिल्हा बॅंकेच्या सामोपचार योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.