Nashik News : 8 दिवसांत वडाळा घरकुलात स्थलांतर करा; गंजमाळ श्रमिकनगरवासियांना महापालिकेची नोटीस

Nashik News : महापालिकेकडून सोडतीद्वारे मिळालेल्या या सदनिकांमध्ये स्थलांतर न केल्यास कारवाईचा इशारा नोटिशीत दिला आहे
Employees of Municipal West Division issuing notice to the residents of Ganjmal Shramik Nagar.according to the Municipal Corporation's survey, a red flower is painted on a house in Shramik Nagar.
Employees of Municipal West Division issuing notice to the residents of Ganjmal Shramik Nagar.according to the Municipal Corporation's survey, a red flower is painted on a house in Shramik Nagar.esakal
Updated on

जुने नाशिक : महापालिका झोपडपट्टी सुधारणा पश्चिम विभागाकडून गंजमाळ श्रमिकनगर वासियांना नोटीस बजावल्या असून त्यात येत्या आठ दिवसांत अर्थात बुधवार (ता.२८) पर्यंत रहिवाशांनी वडाळा गाव येथील घरकुलात दिलेल्या सदनिकांचा ताबा घेण्याची सूचना दिली आहे. तसेच महापालिकेकडून (NMC) सोडतीद्वारे मिळालेल्या या सदनिकांमध्ये स्थलांतर न केल्यास कारवाईचा इशारा नोटिशीत दिला आहे. (Nashik NMC notice to Ganjmal Shramik Nagar residents marathi news)

झोपडपट्टी सुधारणा करण्यासाठी शहराच्या विविध भागात घरकुल योजना राबवून झोपडपट्टीधारकांना चांगल्या प्रतिची घरे महापालिकेकडून उपलब्ध केली जात आहेत. त्यानुसार वडाळा गाव येथे घरकुल योजना इमारती तयार केल्या आहेत. गंजमाळ श्रमिकनगर येथील झोपडपट्टीतील रहिवाशांना सोडतीद्वारे घरकुल योजनेच्या इमारतींमध्ये सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत.

मात्र अनेक वर्ष उलटूनही येथील रहिवाशांनी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या सदनिकांचा ताबा घेतलेला नाही. भाडेकरी टाकून ते श्रमिक नगर येथील झोपडपट्टीतच जैसे थे राहत आहेत. अशा रहिवाशांना महापालिका पश्चिम विभागाने बुधवार (ता.२१) पर्यंत मुदतीच्या नोटिसा बजावल्या आहेत.

आठ दिवसांत रहिवाशांनी त्यांना महापालिकेने दिलेल्या सदनिकांचा ताबा घेत त्यात स्थलांतरित करावे. तसेच श्रमिकनगर येथे असलेली झोपडी, घर स्वतःहून काढून घेण्याचे सूचित केले आहे. तसेच लाभार्थ्यांनी असे न केल्यास लाभार्थ्यांना सदनिकांची गरज नाही, असे गृहीत धरून महापालिका सदनिकांचा ताबा घेईल. (Latest Marathi News)

Employees of Municipal West Division issuing notice to the residents of Ganjmal Shramik Nagar.according to the Municipal Corporation's survey, a red flower is painted on a house in Shramik Nagar.
Nashik AIMA News : अक्राळेतील औद्योगिक भूखंड विक्री लिलाव पद्धतीने करू नका; आयमाचे MIDC अधिकाऱ्यांना साकडे

शिवाय झोपडपट्टी सुधारणा अंतर्गत श्रमिक नगर येथील झोपड्या, घरे निष्कासित करण्यात येतील. झालेल्या कारवाईस पूर्णपणे रहिवासी जबाबदार राहतील, असा इशारा नोटीसमध्ये दिला आहे.

याबाबत कार्यालयाशी कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार करू नये, असाही नोटीसमध्ये उल्लेख केला आहे. अचानक नोटीस बजावल्याने रहिवाशांची एकच तारांबळ उडाली आहे. अनेकांनी घरकुल योजना सदनिकेमध्ये वास्तव्यास असूनही नोटीस बजावण्यात आल्याचा आरोप केला आहे.

तर काहींनी अद्याप सदनिका मिळालेल्या नाहीत, त्यामुळे येथील घरे सोडून कुठे जाणार? असा प्रश्न उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मात्र नोटीस बजावत घरांवर लाल फुलीचे निशान करण्याचे काम सुरू केले आहे. या कारवाईमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

"गेल्या सहा वर्षांपासून वडाळा गाव येथील सदनिकेत वास्तव्यास आहे. तरीही नोटीस बजावण्यात आली आहे."- जुबेर शेख, लाभार्थी

Employees of Municipal West Division issuing notice to the residents of Ganjmal Shramik Nagar.according to the Municipal Corporation's survey, a red flower is painted on a house in Shramik Nagar.
Nashik Police : शनिवारपासून ‘मॉर्निंग वॉक विथ पोलिस’! पोलिस आयुक्तांची संकल्पना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.