Nashik News : शिर्डी-साक्री बायपासला उदासीनतेचा अडसर; रस्ता काँक्रिटीकरणाचे काम ठप्प झाल्याने नाराजीचा सूर

Nashik News : सटाणा शहरातून जाणाऱ्या शिर्डी-साक्री राज्य महामार्गाला बायपास होण्याची मागणी गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित आहे.
Sakri-Shirdi State Highway concreting work is progressing at a slow pace.
Sakri-Shirdi State Highway concreting work is progressing at a slow pace.esakal
Updated on

Nashik News : सटाणा शहरातून जाणाऱ्या शिर्डी-साक्री राज्य महामार्गाला बायपास होण्याची मागणी गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित आहे. बायपास शहराच्या पूर्वेकडून की पश्‍चिमेकडून या वादाबरोबरच बायपाससाठी शेतकऱ्यांच्या अधिग्रहित कराव्या लागणाऱ्या शेतजमिनींच्या नुकसान भरपाईपोटी. (Shirdi Sakri Bypass)

शासनाला द्यावा लागणारा कोट्यवधी रुपयांचा निधी हा कळीचा मुद्दा करून बायपासबाबत प्रशासकीय व राजकीय स्तरावरची उदासीनता कारणीभूत असल्याची भावना बागलाण तालुकावासीयांमध्ये आहे. सध्या बायपासऐवजी शहरातून जाणाऱ्या या रस्ता काँक्रिटीकरणाचे कामही ठप्प झाल्याने नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे.

बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी त्यांच्या कार्यकाळात तालुक्यातील दळणवळण व रस्ते विकासावर लक्ष केंद्रित केल्याने गेल्या दोन वर्षात केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला. त्यातूनच लहान-मोठ्या नद्या-नाल्यांवरील फरशी पूल, घाट कटिंग, तसेच रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करून ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे भक्कम करून दळणवळण सुलभ केले.

मात्र, शहरातून जाणाऱ्या शिर्डी-साक्री महामार्गाला दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांचा स्पीड ब्रेकर लागल्याने काँक्रिटीकरणाचे काम ठप्प होऊन वाहतूक कोंडीमुळे शहरवासीय हैराण झाले आहेत. अनेक वर्षांपासून वाढत गेलेला रस्ते कामांचा अनुशेष गेल्या दोन वर्षांत भरून काढण्यात लोकप्रतिनिधी व राज्य सरकारला यश आल्याचे तालुकावासियांनी पाहिले आहे. असे असताना बायपास रखडणे सामान्यांना न रुचणारे आहे. (latest marathi news)

Sakri-Shirdi State Highway concreting work is progressing at a slow pace.
Nashik ZP News : ‘सुपर 50’ उपक्रमात 5 हजार 700 विद्यार्थ्यांची नोंदणी

साल्हेर किल्ल्याचे अंतर वाचणार

गेल्या दोन वर्षात विधिमंडळाच्या अर्थसंकल्पात रस्ते व पुलांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये मोसम नदीवरील मुल्हेर, सोमपूर, जायखेडा, राजपूरपांडे या रस्त्यावर मोठ्या पुलांसाठी बांधकामे मंजूर झाल्यामुळे दळणवळण अधिक गतिमान व टिकाऊ होणार आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ९० किलोमीटर अंतराचे ग्रामीण रस्ते विकसित करण्यात येत आहेत. रस्ते विकासामुळे साल्हेर या ऐतिहासिक किल्ल्यावर जाण्यासाठी २० किमी अंतर कमी होणार आहे.

Sakri-Shirdi State Highway concreting work is progressing at a slow pace.
Nashik News : स्वेटरविक्रेत्या तिबेटींनी धरली उच्च शिक्षणाची कास; नाशिकमधील तिघे झाले डॉक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.