नांदगाव : दुःख हे प्रत्येकाच्या नशिबी असते, मात्र हे दुःख दूर करण्याची ताकद केवळ स्वतःमध्ये आहे..विश्वात कोणीही बाबा, बुवा, संत महंत हे दुःख दूर करू शकत नाही. परमेश्वराची प्रार्थना करा सर्व दुःख दूर होतील असे प्रतिपादन पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांनी केले. येथील मनमाड नांदगाव रस्त्यावर आमदार सुहास कांदे व सौ.अंजुम कांदे यांनी नियोजन केलेल्या शिव महापुराण कथेचे पहिले पुष्प गुंफताना पंडित मिश्रा यांनी मानवी जीवनातील अध्यात्मातील शिव सत्य दुःख आदी वेगवेगळ्या भाव भावनांचे पदर उलगडून सांगितले. (Pandit Mishra statement on Only within yourself is power to remove suffering)
पहिल्याच दिवशी लाखो शिवभक्तांनी कथा श्रवणासाठी केलेल्या गर्दीमुळे परिसराला मिनी कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. पंडित मिश्रा म्हणाले की, सजीवांचे कल्याण करणारे शिवजी आहेत. मेहनती शिवाय फळ नाही, मेहनत करत रहा, मेहनतीला अध्यात्माची जोड दिल्यास आयुष्याचे कल्याण होईल. सेवा धर्म वाढवा, भाव आणि श्रद्धेने कथा श्रवण करा, निर्मळ मन ठेवा, श्रद्धेने ध्यान करा, शिव प्रसन्न होतील. (latest marathi news)
पितृपक्षात ऐकलेली कथा आणि पितृपक्षातील शिवरात्र या दरम्यान भगवान शंकराच्या पिंडीवर चढवलेले जल मनातील इच्छा पूर्ण करतात. मेहनत, कर्म आणि श्रद्धा यांची जोड असल्याने शिव भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. कथा श्रवण करताना आलेले अनुभव आणि त्या अनुभवामुळे सुटलेले प्रश्न असे शिव भक्तांनी लिहिलेले पत्र पंडित प्रदीप मिश्रा यांनी या शिव महापुराण कथेदरम्यान वाचून दाखवले. तसेच त्यांचा मुख्य यजमान आमदार कांदे दांपत्यांच्या हस्ते सत्कार झाला.
मिनी कुंभमेळा
शिव महापुराण कथेसाठी मनमाड, नांदगाव ये - जा करण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या मोफत बससेवा व जेवणाची व्यवस्था होती. अपंग व आजारी व्यक्तींना व्हील चेअरवर बसवून कथेसाठी नेण्यात येत होते. गर्दीचे नियोजनात पोलिस बंदोबस्त आणि वैद्यकीय पथकेही सज्ज होते. शिव महापुराण कथेची नियोजन समिती, शिवसेना पदाधिकारी, स्वयंसेवक मिळेल ती सेवा बजावत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.