Uddhav Thackeray : तुम्ही जिंकले! आता इतरांची जबाबदारी तुमच्यावर; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा राजाभाऊ वाजे यांना सल्ला

Nashik News : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले.
Rajabhau Vaje, Uddhav Thackeray
Rajabhau Vaje, Uddhav Thackeray esakal
Updated on

Nashik News : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. निवडून आल्यावर त्यांनी बुधवारी (ता. ५) ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तीस मिनिटांच्या चर्चेत ठाकरे यांनी आता विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. (chief Uddhav Thackeray advice to Rajabhau Vaje)

‘तुम्ही निवडून आलात, आता इतरांची जबाबदारी तुमच्यावर’ अशा सल्लावजा सूचना देऊन आगामी काळात खासदार वाजे यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी टाकली. लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. हॅटट्रिक करण्याच्या तयारीत असलेल्या हेमंत गोडसे यांच्या विजयाला वाजे यांनी लगाम लावल्याने ते ‘जायंट किलर’ ठरले.

निवडून आल्यावर खासदार वाजे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी भेट घेतली. अर्धा तास झालेल्या चर्चेत निवडणुकांची इत्यंभूत माहिती वाजे यांनी पक्षप्रमुखांना दिली. विजयामागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह सर्वच घटकांनी मदत केल्याची माहिती देण्यात आली. महाविकास आघाडीचा धर्म घटक पक्षांनी पाळल्याचे वाजे यांनी सांगितले. (latest marathi news)

Rajabhau Vaje, Uddhav Thackeray
Nashik Lok Sabha Constituency : भाजप आमदारांना ‘उद्धव’ शिलेदार भारी! सत्ता नसताना संघर्षात्मक लढा उभारण्याचा दिला संदेश

जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी निवडणुकीसंदर्भात माहिती सादर केली. या वेळी उद्धव ठाकरे यांनी वाजे यांना सल्लावजा सूचना केली. तुम्ही निवडून आले व लोकांनीही तुम्हाला निवडून आणले. आता सर्वांना निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आगामी काळात विधानसभेसह महापालिका, जिल्हा परिषद तसेच पालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणण्याचे आवाहन केले.

संदीप गुळवेंसाठी आमदार दराडेंना आवाहन

भेटीवेळी आमदार नरेंद्र दराडे हेही उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिक्षक मतदारसंघात संदीप गुळवे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पक्षाचे काम करण्याचे आवाहन आमदार दराडे यांना करण्यात आल्याची माहिती बडगुजर यांनी दिली. या वेळी सहसंपर्क नेते दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गिते, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, केशव पोरजे, माजी महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे आदी उपस्थित होते.

Rajabhau Vaje, Uddhav Thackeray
Nashik Lok Sabha Constituency : गृहीत धरण्याची प्रवृत्ती नाशिककरांनी लाथाडली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.