नाशिक : शिवसेनेच्या 'स्वच्छता मोहिमेस' सिडकोतून प्रारंभ

स्वच्छतेबाबत नाशिकला देशात अव्वल स्थान मिळवून देण्यास शिवसेना कटिबद्ध
Nashik Shiv Sena Sanitation campaign started cidco
Nashik Shiv Sena Sanitation campaign started cidcosakal
Updated on

सिडको : स्वच्छतेबाबत नाशिकला देशात अव्वल स्थान मिळवून देण्यास शिवसेना कटिबद्ध आहे. त्यासाठी नागरिकांना यात भेट सामावून घेण्यासाठी शहराच्या सर्व भागात शिवसेनेतर्फे स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे, असे मत महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केले. शिवसेनेतर्फे स्वच्छता मोहिमेचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी ६.४५ वाजता सिडकोत उपेंद्रनगर भागातील सिम्बॉयसिस कॉलेजपासून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. हातात झाडू घेऊन शिवसैनिकांनी स्वतःला या मोहिमेत जुंपून घेतल्याचे चित्र दिसले. महिलांचा सहभागही वाखाणण्याजोगा होता. मोहिमेअंतर्गत उपेंद्रनगर, सिम्बॉयसिस महाविद्यालय परिसर, उत्तमनगर, महाजननगर, अंबड आदी परिसर चकाचक करण्यात आला.

नागरिकांनीसुद्धा स्वच्छतेबाबत जागरूक राहावे आणि रस्त्यावर कुठेही कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी. घरातील कचरा घंटागाडीतच टाकावा. निर्माल्य व घाण नदीत टाकण्याचे टाळावे, असे आवाहन उपनेते सुनील बागूल यांनी या वेळी केले. नाशिक हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील रामकुंडात अस्थी विसर्जित केल्या जातात. त्यामुळे दररोज देश- विदेशातील हजारो भाविक व पर्यटक नाशिकला भेटी देत असतात.

संपूर्ण शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नाशिक महापालिकेतर्फे विविध उपाययोजना केल्या जातात. त्यात खारीचा वाटा म्हणून आम्ही ही स्वच्छता मोहीम हाती घेतली असून महानगरांच्या कानाकोपऱ्यातील कचरा या काळात संकलित करून तो घंटागड्यांच्या साह्याने खत प्रकल्पात पाठविण्यात येणार आहे, असे विजय करंजकर यांनी सांगितले. मोहिमेत माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, संगीता खोडाना, माजी नगरसेविका हर्षा बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, संजय भामरे, शीतल भामरे, सुभाष गायधनी, नाना पाटील, नाना निकम, श्याम साबळे, स्वच्छता दूत विजय शिरसाट, सुरेश शिरोडे, प्रातःयोग ग्रुप (सावतानागर), जॉगर्स ग्रुप (पाटीलनगर), मार्तंड ग्रुप (सावतानागर), रायगड चौक मित्रमंडळ, बडगुजर कोर कमिटी, बडगुजर फाउंडेशन मित्रमंडळ तसेच परिसरातील नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.