Maha Shivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त सजली शहरातील शिवालये

Maha Shivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त शहरातील सर्वच शंकराची मंदिरांमध्ये जय्यत तयारी केली जात आहे.
Ancient Naro Shankar Mahadev Temple
Ancient Naro Shankar Mahadev Templeesakal
Updated on

Maha Shivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त शहरातील सर्वच शंकराची मंदिरांमध्ये जय्यत तयारी केली जात आहे. यानिमित्ताने सर्व महादेवाच्या मंदिरांमध्ये भाविकांकडून साफसफाई करण्यात आली असून मंदिरांवर रोषणाई करण्यात आली होती. यानिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रम, महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. (nashik Maha Shivratri marathi news)

पेशव्यांचे सरदार नारोशंकर राजेबहाद्दूर (दाणी) यांनी१७४७ साली नारोशंकर महादेव मंदिर बांधले. रामेश्‍वर मंदिराच्या बांधकामासाठी सरदार नारोशंकर यांनी राजस्थान व गुजरातमधून कुशल कारागीर आणून या मंदिराचे बांधकाम करण्यात आले. मंदिराचे मुख्य शिखर २६ मीटर असून त्यावर पौराणिक प्रसंगांसह वाघ, सिंह अशी प्राण्यांची शिल्पे कोरण्यात आली आहेत.

उत्तरेकडील भिंतीच्या मध्यभागी अक्षयनागाचे मोठे शिल्प आहे. हे शिल्प म्हणजे शिवाने मृत्यूवर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर भलीमोठी घंटा असून तिचा परीघ १८० से.मी. तर उंची १०७ से.मी. आहे. ही घंटा म्हणजे पोर्तुगिजांविरुद्ध वसईच्या युद्धात मिळालेल्या विजयाचे प्रतीक आहे.

कास्य, कथिल व अल्प प्रमाणात जस्त यांच्या मिश्रणातून या घंटेची निर्मिती करण्यात आली आहे. राजेश राजेबहाद्दूर व अन्य कुटुंबीय या मंदिराची देखभाल करतात. श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीस या मंदिरात लघुरुद्रांचा अभिषेक केला जातो. (latest marathi news)

Ancient Naro Shankar Mahadev Temple
Maha Shivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त येरवडा भागात वाहतुकीत बदल
सिद्धेश्‍वर महादेव मंदिर
सिद्धेश्‍वर महादेव मंदिरesakal

सिद्धेश्‍वर महादेव मंदिर

जुन्या नाशिकमधील दिल्ली दरवाजातील जुन्या लोकमान्य शाळेशेजारी सिद्धेश्‍वर महादेव मंदिर आहे. प्राचीन स्वयंभू मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. मंदिराला प्रती कपालेश्‍वर मंदिरही म्हटले जाते. कपालेश्‍वराप्रमाणेच या ठिकाणीही शंकरासमोर नंदी नाही, म्हणून याला प्रती कपालेश्‍वर असेही म्हटले जाते, अशी माहिती पंकज उंदिरवाडकर यांनी दिली. गत चार पिढ्यांपासून उंदिरवाडकर परिवारासह छोटू गायधनी या मंदिराची देखभाल करतात.

तीळवृद्धेश्‍वर अर्थात तीळभांडेश्‍वर

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत संस्थेजवळ तीळभांडेश्‍वर लेनमध्ये हे मंदिर आहे. या मंदिराचे खरे नाव तीळवृद्धेश्‍वर म्हणजे तिळातीळाने वाढणारे, असा होतो. कालांतराने या शब्दाचा अपभ्रंश होऊन ते तीळभांडेश्‍वर असे झाल्याचे विकी जंगम यांनी सांगितले. सतीश निरंतर व अन्य मंदिराची देखभाल करतात. प्रदोषसह श्रावणी सोमवारी येथून पालखी सोहळा रंगतो.

तीळवृद्धेश्‍वर अर्थात तीळभांडेश्‍वर
तीळवृद्धेश्‍वर अर्थात तीळभांडेश्‍वरesakal
Ancient Naro Shankar Mahadev Temple
Maha Shivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त न्याहळोदला यात्रोत्सव
राजराजेश्‍वर महादेव मंदिर, अदित्यकुंज
राजराजेश्‍वर महादेव मंदिर, अदित्यकुंजesakal

राजराजेश्‍वर महादेव मंदिर, अदित्यकुंज

राज्यातील सर्वात मोठे असलेले बारा फुटी अखंड नर्मदेश्‍वर महादेव श्री सदगुरू ग्रुपतर्फे दिंडोरी रोडवरील अदित्य कुंज येथे स्थापन करण्यात आले आहे. मंदिरातील शिवलिंगाचे वजन १२ टन असून ते बारा ज्योतीर्लिंग स्वरूप असल्याचे विश्‍वस्त प्रफुल्ल ढोलकिया यांनी सांगितले. येथे उभारण्यात आलेले २१ फुटी त्रिशूल लक्षवेधी आहे.

पन्नास फुट उंचीच्या या मंदिराचे काम अवघ्या नव्वद दिवसांत पूर्ण झाले. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी आरती, आठला रुद्राभिषेक, सायंकाळी पाचला भजन, सातला महाआरती, रात्री आठला प्रसाद वाटप होणार आहे.

प्राचीन श्री निलकंठेश्‍वर महादेव मंदिर

गोदावरीच्या उजव्या तटावर देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणाच्या प्रवेशाजवळ काळ्या पाषाणातील हे मंदिर आहे. १७४७ साली पेशव्यांचे सरदार नारोशंकर राजेबहाद्दर यांचे बंधू लक्ष्मण शंकर यांनी नारोशंकर मंदिरासह या मंदिराची निर्मिती केली. ज्याचा कंठ निळा अशा निलकंठेश्‍वर महादेवाच्या मंदिरात पायऱ्या चढून गेल्यावर पहिल्यांदा दगडी नंदी तर पुढे संगमरवरातील नंदी दृष्टीस पडतो.

येथील शंकराची पिंड द्वीपिंडी आहे. म्हणजे दगडी पिंडीवर संगमरवरी पिंड आहे. पिंडीवर नक्षादार नागाचे आकर्षक चित्र आहे. तपाची जागा म्हणूनही पुराणात या ठिकाणाचा उल्लेख आढळतो. मंदिरात दरवर्षी महाशिवरात्र, त्रिपुरारी पोर्णिमा, श्रावणी सोमवार काळात उत्सव साजरे केले जातात. श्री काशिकर बंधुंकडे या मंदिराची वंशपरंपरागत व्यवस्था आहे.

प्राचीन श्री निलकंठेश्‍वर महादेव मंदिर
प्राचीन श्री निलकंठेश्‍वर महादेव मंदिरesakal
Ancient Naro Shankar Mahadev Temple
Maha Shivratri 2024 : म्हसदीत 2 दिवस यात्रोत्सव; महाशिवरात्रीनिमित्त उद्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम
प्राचीन श्री कपालेश्‍वर महादेव मंदिर
प्राचीन श्री कपालेश्‍वर महादेव मंदिर esakal

प्राचीन श्री कपालेश्‍वर महादेव मंदिर

रामतीर्थासमोरच प्राचीन श्री कपालेश्‍वर महादेवाचे स्वयंभू मंदिर आहे. १७३८ साली कोळी समाजबांधवांनी या मंदिराचे बांधकाम केल्याचा उल्लेख आढळतो. स्वयंभू असलेल्या हे मंदिर देशातील नंदी नसलेले हे एकमेव शिवालय असून त्याबाबत आख्यायिका सांगितली जाते. याठिकाणी नंदी हे भगवान शंकराचे गुरू झाल्याने याठिकाणी नंदी नाही. श्री कपालेश्‍वराची दर सोमवारी पालखी निघते.

या पालखीच्या माध्यमातून श्रींची ग्रामप्रदक्षिणाही होते. दर शनिवारच्या महापूजेला विशेष महत्त्व आहे. येथील दर्शनाने पितृदोषही दूर होतात, अशी आख्यायिका आहे. दर सोमवारसह प्रदोषला दर्शनासाठी मध्यरात्रीपर्यंत शिवभक्त दर्शन व महाआरतीसाठी येतात. ॲड. प्रशांत जाधव विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष असून ॲड. अक्षय कलंत्री सचिव म्हणून काम पाहतात. याशिवाय श्रद्धा दुसाने, रावसेह कोशिरे, श्रीकांत राठी, सुनील पटेल, मंडलेश्‍वर काळे आदी विश्‍वस्त म्हणून काम पाहतात.

Ancient Naro Shankar Mahadev Temple
Maha Shivratri Festival : महाशिवरात्री निमित्त शहरात महादेवाचरणी भाविकांच्या लागल्या रांगा; पाहा Photos
Ancient Naro Shankar Mahadev Temple
Lord Shiva Temples: महाराष्ट्रातील 12 प्रसिद्ध शिव मंदिरे
स्वयंभू श्री सोमेश्‍वर महादेव मंदिर, सोमेश्‍वर
स्वयंभू श्री सोमेश्‍वर महादेव मंदिर, सोमेश्‍वरesakal

स्वयंभू श्री सोमेश्‍वर महादेव मंदिर, सोमेश्‍वर

गोदेकाठी असलेले श्री सोमेश्‍वर महादेव मंदिर आहे. मुरलीधर पाटील हे मुख्य विश्‍वस्त आहे. दिनेश भामरे हे व्यवस्था पाहतात. पद्मपुराणातील उल्लेखानुसार एकदा देवसभा सुरू असताना ब्रह्मदेवाकडून शिवाची निंदा सुरू होते, त्यामुळे क्रोध अनावर झालेल्या शंकराने ब्रह्मदेवाचे पाचवे मुख छाटून टाकले. या पापातून मुक्तता मिळण्यासाठी त्यांनी तीर्थाटन सुरू केले.

यावेळी नारदाने शिवशंभूची भेट घेत त्यांना पृथ्वीतलावरील सोमेश्‍वर येथील देवनारायण शर्मा नावाच्या ब्राह्मणाची भेट घेण्याचा सल्ला दिला. रात्री सोमेश्‍वर येथील मुक्कामी ब्राह्मणाच्या घरची गाय व तिचे वासरू (नंदी) यांच्यातील संवाद एकला. वासरू गाईला म्हणाले, उद्या ब्राह्मणाने मला वेसन घालण्याचा प्रयत्न केल्यास मी त्याला ठार मारेल.

तेव्हा गाईने वासराला तसे केल्यास तुला ब्रह्म हत्येचे पातक लागेल, असे सांगितले. तेव्हा वासराने मला यावरचा उपायही माहीत असल्याचे सांगितले. भगवान शंकर हा संवाद एकत होते. ब्राम्हणाने वासराला वेसन घालण्याचा प्रयत्न करताच वासराने त्याला ठार केले, त्यानंतर वासराने रामकुंडावर येत रामतीर्थात उडी घेतली, त्यामुळे त्याचे पाप धुतले गेले.

याप्रमाणे महादेवानेही रामतीर्थात डुबकी मारल्यावर त्यांचेही पाप धुतले गेले. अशा प्रकारे रामतीर्थासमोरच श्री कपालेश्‍वराची स्थापना झाली. याचदरम्यान सोमेश्‍वर येथील ब्राह्मणाच्या घराच्या जागेवर देवादिकांनी शिवालयाची स्थापना केली, तेच हे सोमेश्‍वर महादेव मंदिर

Ancient Naro Shankar Mahadev Temple
Trimbakeshwar Maha Shivratri : त्र्यंबकेश्‍वरमध्ये महाशिवरात्रीला मिरवणुकीने ज्योतिर्लिंगाचे दर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.