Uday Samant : ‘क्लस्टर’साठी नाशिकचा प्राधान्याने विचार व्हावा : निमाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना साकडे

Uday Samant
Uday Samantesakal
Updated on

Uday Samant : केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मंजूर केलेले इलेक्ट्रॉनिक-इलेक्ट्रिकल क्लस्टर उभारताना नाशिकचा प्राधान्याने विचार व्हावा अशी आग्रही मागणी नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)चे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीवेळी केली.

त्यावर श्री. सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नाशिकला क्लस्टर होण्याचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे आहेत. (Nashik should be considered as priority for Cluster Nima Industry letter to Minister Uday Samant news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Uday Samant
Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस घेणार पहिणे गाव दत्तक? दौऱ्याची प्रशासनाकडून जोरदार तयारी

निमा पॉवर एक्झिबिशनच्या माध्यमातून या क्लस्टरला मूर्त स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी निमा प्रयत्नशील आहे. या क्षेत्रासाठी मोठी गुंतवणूक आणण्यासाठी महाराष्ट्र शासनानेही प्रयत्न करावेत, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

तसेच, निमा पॉवर एक्झिबिशनच्या उद्‌घाटनासाठी येण्याचे निमंत्रणही शिष्टमंडळाने त्यांना दिले. त्यावरही श्री. सामंत यांनी तातडीने होकार दिला.

राज्याचे विकास आयुक्त दिपेंद्रसिंग कुशवाह, सहआयुक्त डी. एस. कोर्बू, निमाचे सचिव राजेंद्र अहिरे, निमा पॉवरचे चेअरमन मिलिंद राजपूत, विजय जोशी, विराज गडकरी, राजेंद्र वडनेरे, आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे यांच्यासह एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, जयंत बोरसे, संदीप पाटील आदींसह प्रशासकीय अधिकारी व उद्योजक या वेळी उपस्थित होते.

Uday Samant
Nashik: कृषी, औद्योगिक, पर्यटनाचा 3 महिन्यात अहवाल द्या; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()