Nashik Shravan Somvar : श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.१८) दुपारपासून बम..बम.. भोलेचा गजरात फेरीसाठी भाविक त्र्यंबकेश्वरला दाखल होण्यास सुरुवात होईल. खंबळ्यापासून खासगी वाहनांना प्रवेशबंदी असल्याने आलेल्या भाविकांना एसटी बस, सिटीलिंकच्या बसने प्रवास करावा लागणार आहे. (shravan somvar 350 buses for Brahmagiri Pradakshina )