पिंपळगाव बसवंत : द्राक्ष हंगामासाठी महत्त्वाची असलेली फळधारणा छाटणीची लगबग सुरू झाली आहे. पावसाचा धोका पत्करुन आगाप छाटणीचा श्रीगणेशा झाला आहे. निफाड तालुक्यातील ५० हजार एकरवरील बागांपैकी सप्टेंबर अखेरपर्यंत २० टक्के द्राक्षबागांच्या छाटण्या होण्याची शक्यता आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमधील विविध मुहुर्तावर छाटणीचे नियोजन केले आहे. पावसाने उघडीप दिल्याने फळछाटणीसाठी आदिवासी मजूर दाखल होत आहे. (grape chhatni Lagbag in Niphad)