Janmashtami 2024 : द्वारका परिसरातील ‘इस्कॉन’चे श्री श्री राधा मदनगोपाल मंदिर सोमवारी (ता. २६) भाविकांनी गजबजला होते. राधा-श्रीकृष्णाच्या मनमोहक रूपाने भाविकांवर मोहिनी फेरली होती. सोमवार पहाटेपासून सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांत भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त मंदिराची तसेच श्री राधा-कृष्णांच्या विग्रहांची सुंदर सजावट केली होती. महोत्सवाला पहाटे पाचच्या मंगल आरतीपासूनच सुरवात झाली. ( Shri Krishna Janmashtami Festival at ISKCON Temple )