Nashik News : शहरातील नागरिकांसाठी काश्यपी धरणातून सोडलेले पाणी तत्काळ बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे केली आहे. या धरणातील ३० टक्के पाणी शेतीसाठी आरक्षित ठेवण्याचा प्रस्ताव धोंडेगाव, कश्यपनगर, इंदिरानगर व देवरगाव येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवला आहे. जून संपण्यावर आला तरी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. (Shut off water of Kashyapi dam immediately Farmers demand to Collector)
परिणामी धरणाची पातळी खालावली असून, सद्यःस्थितीत ९१८ दशलक्ष घनफूट म्हणजे १६ टक्के साठा आहे. या धरण समूहातील काश्यपीत ४१९ दशलक्ष घनफूट (२२ टक्के) साठा आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता पोलिस बंदोबस्तात काश्यपी धरणातून सोमवारी ५०० क्यूसेस विसर्ग गंगापूरसाठी सुरू केला आहे.
हा विसर्ग तत्काळ थांबवावा, अशी मागणी कश्यपी धरणालगतच्या शेतकऱ्यांनी केली आहे. त्यांनी मंगळवारी (ता. २५) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले. त्यानुसार, ग्रामस्थांनी धरणग्रस्तांच्या विविध मागण्याही मांडल्या. यात वारसांना शासकीय नोकरी, स्थलांतरित ग्रामस्थांना मूलभूत सुविधा पुरविण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. (latest marathi news)
स्थलांतरित गावांचे प्रश्न आजही कायम
धोंडेगाव, कश्यपनगर, इंदिरानगर व देवरगाव या १०० टक्के आदिवासी वस्ती असलेल्या चारही गावात जवळपास २० ते २५ हजार लोक राहतात. तसेच जनावरांचे प्रमाण भरपूर आहे. धोंडेगाव व देवरगाव येथे आदिवासी आश्रमशाळा असून या ठिकाणी १५०० ते २००० विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेला काश्यपी धरणातून पाणी पिण्यासाठी वापर केला जातो.
धरणात ५०० ते ६०० खातेदारांच्या जमिनी गेलेल्या आहेत. त्यापैकी आजपर्यंत फक्त ६० व्यक्तींना महापालिकेने सेवेत सामावून घेतले आहे. परंतु, उर्वरित खातेदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सर्व खातेदारांना विनाअट महापालिका किंवा जलसंपदा विभागात समाविष्ट करून घ्यावे.
तसेच करारानुसार कश्यपनगर (खाडेचीवाडी) व देवरगावचे पुनर्वसन झाले. परंतु, या गावांना सोयीसुविधांचा अभाव आहे. त्या त्वरित पूर्ण करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.