Simhastha Kumbh Mela : सन २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने जिल्हास्तरीय समितीप्रमुखपदी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आहे. परंतु पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या अधिकारात सिंहस्थ आढावा बैठक बोलाविल्याने महायुतीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनावरून सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. २०२७-२८ मध्ये शहरात सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. (nashik Simhastha Kumbh Mela marathi news)
राज्य नगरविकास विभागाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात प्रमुख शिखर समितीसह विविध प्रकारच्या चार समित्यांची स्थापना केली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन आराखड्यास मंजुरी व खर्चास मंजुरी देणे, नियोजन आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, सर्व विभागांत समन्वय ठेवणे अशा प्रकारची जबाबदारी असणार आहे.
या साधु-महंत व भाविकांना दळणवळण, पाणीपुरवठा, निवास, आरोग्य, वीजव्यवस्था पुरविणे तसेच कायदा सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थेसाठी नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी या चार समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. समिती स्थापन होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी समित्यांची बैठक झाली. नाशिक दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
गिरीश महाजन समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांनी बैठक घेणे अपेक्षित होते. परंतु जिल्हास्तरीय समितीचे सहअध्यक्ष तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी पालकमंत्री म्हणून सिंहस्थ आढावा बैठक बोलावली. त्यामुळे महायुतीत सुंदोपसुंदी सुरू झाल्याचे बोलले जात आहे. पालकमंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे.
महापालिका आराखडा सादर करणार
महापालिकेकडून अकरा हजार ११७ कोटी रुपयांचा सिंहस्थ आराखडा तयार केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आराखड्यात कुठल्या प्रकारची कपात न करता आराखडा सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ५६ किलोमीटरचा रिंग रोड, साधुग्राम उभारणी, ‘नमामि गोदा’ आदी महत्त्वाच्या प्रकल्पांवर चर्चा होणार आहे. (latest marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.