Nashik News : पंतप्रधानांच्या दौऱ्याचा खर्च वाढताच पुतळ्यांच्या रंगरंगोटीवर 10 लाखांचा खर्च

Nashik : राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा आटोपून दीड महिना उलटला तरी खर्चाची बिले येण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही.
Money (file photo)
Money (file photo)esakal
Updated on

Nashik News : राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा आटोपून दीड महिना उलटला तरी खर्चाची बिले येण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. ३० कोटींच्या कामांना स्थायी समितीने मागील महिन्यात मंजुरी दिल्यानंतर आता पुतळ्यांच्या रंगरंगोटीवर दहा लाख खर्च झाल्याने त्या खर्चाच्या मंजुरीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला. (Nashik since PM Narendra Modi visit to amount of expenditure not decreased)

गुरुवारी (ता.२९) स्थायी समितीची सभा होत आहे. या सभेनिमित्त पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर झालेल्या खर्चाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मोदी यांच्या स्वागतासाठी शहर सजविण्यात आले होते.

यात रस्त्यांचे डांबरीकरण, थर्मल पेंट मारणे, स्वच्छता गृहांची साफसफाई व रंगरंगोटी तसेच गोदाघाट स्वच्छता, विद्युत रोषणाई, रंगरंगोटी, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे अशी सुमारे तीस कोटी रुपयांची कामे करण्यात आली. (latest marathi news)

Money (file photo)
Nashik Water Cut : शहरातील 70 टक्के भागात शनिवारी पाणीबाणी

त्या कामांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंजुरी देण्यात आली. ३० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिल्यानंतर आता पुन्हा बांधकाम विभागाने पुतळ्यांच्या रंगरंगोटीसाठी दहा लाख रुपये खर्च कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव स्थायी समितीवर सादर केला आहे.

पुतळ्यांच्या रंगरंगोटी पाठोपाठ तपोवनातील हनुमान नगर येथील खासगी मालकीच्या जागेत ड्रेनेज दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यावरही ११ लाख ८१ हजार रुपयांचा खर्च झाला असून त्याच्या कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

Money (file photo)
Nashik Adivasi Morcha : ...अन्यथा पुन्हा मुंबईत लाँग मार्च! ‘लाल वादळा’चा ठिय्या कायम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.