Nashik Forest Department : वन विभागात एकाच अधिकाऱ्याकडे अनेक पदभार; अतिरिक्त कामाचा ताण

Nashik News : नाशिक वन विभागात वन संवर्धन व वन्यजीव संरक्षण असे संवेदनशील खात्यामध्ये एकाच व्यक्तीकडे अनेक जबाबदाऱ्या असल्यामुळे कामांमध्ये विलंब लागण्याची शक्यता निर्माण होत आहे.
Forest Department
Forest Departmentesakal
Updated on

Nashik News : नाशिक वन विभागात एकाच अधिकाऱ्याकडे अनेक पदभार दिल्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण निर्माण होत आहे. वन संवर्धन व वन्यजीव संरक्षण असे संवेदनशील खात्यामध्ये एकाच व्यक्तीकडे अनेक जबाबदाऱ्या असल्यामुळे कामांमध्ये विलंब लागण्याची शक्यता निर्माण होत आहे. प्रादेशिक परिक्षेत्रातील १० हून अधिक अतिरिक्त पदभार म्हणजेच नाशिक जिल्ह्यात जवळपास तीन हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ वन विभागाचे आहे. (Nashik Forest Department)

त्यामधील अंदाजे २२०० चौरस किलोमीटर क्षेत्र म्हणजेच ७० टक्क्यांहून अधिक क्षेत्राचा कार्यभार हा एकाच अधिकाऱ्याकडे आहे. वनविभागातील सहाय्यक संरक्षक (रोहयो व वन्यजीव), सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक पश्चिम भाग, सहाय्यक जंकास व कॅम्प (पेठ) व (पूर्व), उपविभाग अतिरिक्त कार्यभार अशा एकापेक्षा अधिक असलेल्या जबाबदाऱ्या आहेत. जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागात दोन व मूल्यांकन येथे एक असे तीन सहाय्यक वनसंरक्षक दर्जाचे अधिकारी आहेत.

त्यापैकी प्रत्येकाला किमान एक किंवा दोन पदभार देता येणे शक्य आहे. इतके पदभार असल्यामुळे सदर अधिकारी कुणाचेही फोन सुद्धा स्वीकारत नाही. त्यामुळे इतर अधिकाऱ्यांना काही पदांचा चार्ज दिल्यास अतिरिक्त पदभारांमुळे आलेला ताण कमी होऊ शकतो. नाशिक वन विभागात नाशिक व नगर यांचा काही भाग समाविष्ट आहे. शासकीय २०१२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १८४७ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहे.

अंमलबजावणीमध्ये दिरंगाई

नाशिक पश्चिम विभागात इगतपुरी, नाशिक, त्र्यंबक, नानाशी, बाऱ्हे, पेठ, हरसुल, सिन्नर असे क्षेत्र आहे. तर पूर्व विभागात दिंडोरी, कळवण, देवळा, सप्तशृंगी अशा बारा प्रादेशिक व अतिशय घनदाट जंगलाच्या क्षेत्र आहे. सदर क्षेत्रात वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. त्यामुळे वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन करणे. (latest marathi news)

Forest Department
Nashik ZP News : ‘सुपर 50’ उपक्रमात 5 हजार 700 विद्यार्थ्यांची नोंदणी

रोप वनांना भेटी देऊन कामकाजाचे मूल्यांकन करणे, वनक्षेत्राचा मासिक आढावा घेणे, वन परिसरात क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नियंत्रण व लक्ष ठेवणे, मानव व बिबटे संघर्ष हाताळणे, वन्यजीव हल्ल्यात पशुधन मालकांना अर्थसाहाय्य देणे, वन क्षेत्रातील अतिक्रमण निर्मूलन अशी अनेक प्रकारची महत्त्वाची कामे सहाय्यक वनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पार पाडावी लागते. त्यामुळे कार्यालयीन कामात व अंमलबजावणीमध्ये दिरंगाई होत आहे. मात्र एकाच अधिकाऱ्याकडे इतके पदभार दिले हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.

तस्करीतील संशयित सापडेना

तस्करीमध्ये वन विभागाच्या अनेक कारवाया गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. यामधील काही छोट्या तर काही मोठ्या स्वरूपाच्या होत्या. मात्र कारवाईतील प्रथम दर्शनी जे संशयित सापडले आहे, त्यांच्याकडून माहिती मिळवूनही उर्वरित संशयित वन विभागाच्या हाती अजूनही लागलेले नाही. यामध्ये प्रामुख्याने खैर तस्कर नवसू लोहार ऊर्फ पुष्पा यास अटक करून जवळपास वीस दिवस झाले आहे. वन विभागाचे पथक गुजरात राज्यात तीन दिवस तळ ठोकून होते. तरीही उर्वरित २५ संशयित वन विभागाच्या हाती लागलेले नाही.

Forest Department
Nashik News : स्वेटरविक्रेत्या तिबेटींनी धरली उच्च शिक्षणाची कास; नाशिकमधील तिघे झाले डॉक्टर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.