Nashik News : मालेगावला सण-उत्सवामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी; मंदिर-मशिदीच्या एकाच भिंतीमुळे विषमतेची दरी दूर

Nashik : एकेकाळी दंगलीचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या शहराने शांततेची कुस धरली आहे. येथे हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये सामाजिक सलोखा वाढत आहे.
The temple-mosque which is considered as a symbol of national unity here.
The temple-mosque which is considered as a symbol of national unity here.esakal
Updated on

Nashik News : एकेकाळी दंगलीचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या शहराने शांततेची कुस धरली आहे. येथे हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये सामाजिक सलोखा वाढत आहे. हिंदू-मुस्लिमांच्या एकत्र येणाऱ्या सणांमुळे सामाजिक सौहार्द जपले जात आहे. गेल्यावर्षी बकरी ईद व पवित्र आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याने संगमेश्‍वरातील मुस्लिम बाधवांनी कुर्बानी एक दिवस उशिरा केली. या निर्णयामुळे सामाजिक सलोखा वाढला. (nashik single wall of temple and mosque gap of disparity is removed marathi news )

बॉम्बस्फोटावेळी मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांनी रक्तदान करुन राज्यात वेगळा संदेश दिला होता. येथील महाराष्ट्र बँकेजवळील मंदिर व मशिदीची भिंत एकच असल्यामुळे हे ठिकाण हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक बनले आहे. मालेगावची अतिसंवेनशील शहर म्हणून ओळख होती. शहराने गेल्या २४ वर्षापासून शांततेची कुस धरली आहे. शहरात २६ ऑक्टोबर २००१ ला शेवटची दंगल झाली.

यानंतर किरकोळ कुरबुरी वगळता येथे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, अशी अप्रिय घटना घडली नाही. वर्षापूर्वी गणेशोत्सव व मोहरम एकाच कालावधीत साजरे झाले. यावर्षी चार दिवसात गुढीपाडवा, रमजान ईद, महात्मा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे.

सप्टेंबर महिन्यात ईद-ए-मिलाद व अनंत चतुर्थी एका दिवसाच्या फरकाने आले आहे. या सणांमुळे बाजार गजबजलेला असतो. हिंदू बांधवांचे सण संपले की लगेच मुस्लिम बांधवांचे सण येतात. त्यामुळे येथील बाजारपेठेत उलाढाल वाढते. दीपोत्सवाच्या फराळाला हिंदू बांधवांच्या घरी मुस्लिम बांधव, तर रमजान ईदला हिंदू बांधव मुस्लिम बांधवांच्या घरी शिरखुर्मा खाण्यासाठी जातात.

The temple-mosque which is considered as a symbol of national unity here.
Nashik News : भुजबळ फार्म हाऊसवर ड्रोनप्रकरणी एकाला अटक

सामाजिक सलोख्याचे बॅनर झळकले

येथे सामाजिक सलोखा दिवसेंदिवस वाढत आहे. हिंदू-मुस्लिमांचे अनेक सण एकाच दिवशी आल्याने दोन्ही समाजातील नागरीक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. त्याची प्रचिती बॅनरच्या स्वरुपात दिसत आहे. येथील मोसम पुल चौक, नवीन बसस्थानक, राष्ट्रीय एकात्मता चौक, कॉलेज मैदान यांसह विविध भागांत एकमेकांना शुभेच्छा देण्याचे बॅनर झळकत आहेत.

''पूर्वी लहान गोष्टींमुळे शहरात दंगली व्हायच्या. येथे सामाजिक सलोखा कायम ठेवणारे पोलिस अधिकारी आले. त्यांनी दोन्ही समाजाला एकत्रित करण्याचे काम केले. पोलिस, प्रशासन तसेच शहरातील दोन्ही समाजाच्या नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे राष्ट्रीय एकात्मता बळकट होत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासताना येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील चांगले काम केले आहे.''- केवळ हिरे, उपाध्यक्ष, मालेगाव राष्ट्रीय एकात्मता समिती

''२८ मार्च तिथीप्रमाणे शिवजयंतीला सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून समाजात वेगळा संदेश दिला आहे. या निमित्ताने दोन्ही समाजात भाईचारा वाढणार आहे.''- सलमान शेख, अध्यक्ष, किदवाई रोड हॉकर्स युनियन, मालेगाव

The temple-mosque which is considered as a symbol of national unity here.
Nashik News : गोदावरी नागरी सहकारी बँकेला 3.16 कोटींचा नफा : अमृता पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.