Nashik Water Scarcity : सिन्नर तालुक्यातील 5 गावे आणि 54 वाड्या, वस्त्यांवर पाणीटंचाई! 15 टँकरच्या फेऱ्या सुरू

Water Crisis : सिन्नर तालुक्यातील पाच गावे आणि ५४ वाड्या, वस्त्यांवर १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.
Women drawing water from a well in Audhainwadi settlement.
Women drawing water from a well in Audhainwadi settlement.esakal
Updated on

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : तालुक्यातील पाच गावे आणि ५४ वाड्या, वस्त्यांवर १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. सिन्नर शहरात दोन दिवसांआड, तर ग्रामीण भागात पाच ते सहा दिवसांआठ पाणीपुरवठा होत आहे. (Nashikwater scarcity sinnar marathi news)

सिन्नर तालुक्यात चार-पाच वर्षांपासून पर्जन्यमान घटले आहे. त्यामुळे पाणीपातळी खोल गेली आहे. चार-पाच वर्षांत एकदाही मुबलक पाऊस न झाल्याने विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठला आहे. शेतीलाही पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शेकडो एकर फळबागा शेवटच्या घटका मोजत आहेत.

निर्यातक्षम द्राक्षांसह डाळिंबच्या फळबागा वाचविण्यासाठी टँकरने पाणी विकत आणले जात आहे. दुष्काळामुळे शेती व्यवसाय पुरता कोलमडला आहे. कांद्यालाही बाहेरून पाणी भरावे लागत आहे. त्यात कांद्याला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पॉलिहाउस, नेटमध्ये पिके घेतलेल्या शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाचा फटका बसला.

या गावात राबवल्या पाणीयोजना

भोजापूर धरणातून कणकोरीसह पाच गावे, मनेगावसह १८ गावे या योजना सुरू असून, वावीसह ११ गावे, वडांगळीसह २७ गावे, बारगावपिंप्रीसह सात गावे, नायगावसह १२ गावे आणि उंबरदरी धरणातून ठाणगावसह पाच गावे या ‘मजिप्रा’च्या पाणीयोजना राबविल्या आहेत.  (latest marathi news)

Women drawing water from a well in Audhainwadi settlement.
Water Crisis : पाणी टंचाईच्या झळा आणि कळा..; पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार!

धरणातील साठा

सध्या भोजापूर धरणात ४० दशलक्ष घनफूट, बोरखंडमध्ये २०, तर ठाणगाव, सरदवाडी, कोनांबे एमआय टॅंकमध्ये १२ ते १५ दशलक्ष घनफूट साठा असल्याचे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता व्ही. के. आचट यांनी सांगितले.

पशुधनाची झाडाच्या पाल्यावर गुजराण

सिन्नर तालुक्याचा पूर्व व पश्चिम भागात गंभीर पाणीटंचाई जाणवत आहे.अनेक तलाव कोरडेठाक पडले आहेत. तेथील महिला विहिरीच्या पाण्यातून गुजराण करीत आहेत. पशुधनाला चारा नसल्याने झाडाच्या पाल्यावर दिवस काढत आहेत.

"तालुक्यातील गावे किंवा वाड्यांचे पाण्यासाठी प्रस्ताव आल्यास ते तातडीने प्रांताधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविले जात आहेत."-सुरेंद्र देशमुख, तहसीलदार

"सध्या दहा शासकीय व पाच खासगी टँकरने पाच गावे व ५४ वाड्यांवर टँकरच्या फेऱ्या सुरू असून, अनेक गावांमध्ये पाण्याची सोय केली आहे. वरिष्ठ स्तरावरून आलेले प्रस्ताव तत्काळ अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येत आहेत."

-अनिल निरगुडे, कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती

Women drawing water from a well in Audhainwadi settlement.
Nashik Water Crisis : प्राणी, पक्षींची पाण्यासाठी वणवण! सप्तशृंगी गड, मार्केंडेय पर्वत परिसरातील पाण्याचे स्त्रोत आटले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.