Nashik Crime News : कार्यालयात काम करणाऱ्या तरुणीला शिवीगाळ; सिन्नरला भाजपच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Nashik News : जयंत आव्हाड यांच्या विरोधात त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या युवतीने शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार दिल्याने सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal
Updated on

Nashik News : येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी जयंत आव्हाड यांच्या विरोधात त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या युवतीने शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार दिल्याने सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Sinnar Abusing young woman working in an office filed case against office bearers of BJP)

फिर्यादी युवती मंगळवारी दुपारी आव्हाड यांच्या सूर्योदय संकुलातील भाजप संपर्क कार्यालयात आव्हाड यांच्याकडे केलेल्या कामाचे ८ हजार १६५ रुपये मागण्यासाठी गेली असता आव्हाड यांनी तुला फक्त ५ हजार रुपये देईल, तुझे तेवढे पैसे होत नाही असे म्हणून पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा फिर्यादीने ५ हजार रुपये घेण्यास नकार देऊन ८ हजार १६५ रुपयांची मागणी केली.

यावेळी दोघांमध्ये वादावादी होऊन आव्हाड यांनी फिर्यादीस अश्‍लील शिवीगाळ करुन दमदाटी केल्याची फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांनी सदर युवतीला अश्‍लील शिवीगाळ व दमदाटी केल्याचा व्हिडीओ सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन व्हायरल केला आहे. (latest marathi news)

Nashik Crime News
Nashik Crime News : खैर तस्करीमध्ये गुजरातचे 15 जण; संशयित लोहारच्या वन कोठडीत वाढ

दरम्यान, जयंत आव्हाड यांनी आपल्या कार्यालयातून एका महिला कर्मचाऱ्याने एक लाख रुपये चोरी केल्याची पोलिसांकडे केली आहे. आव्हाड यांच्या तक्रारीनुसार सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे कार्यालय गाळा नं १२/१३, सुर्योदय संकुल असून सदर कार्यालयामध्ये नोकरी करणाऱ्या युवतीने एक महिन्यापुर्वी केबीनमधून एक लाख रूपये चोरी केले.

दुसऱ्याच दिवशी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिला विचारले असता तिने पैसे चोरी केल्याचे कबुल केल्याचे आव्हाड यांचे म्हणणे आहे. मी व माझी आई कर्जबाजारी असून कर्जाची परतफेड करण्यासाठी पैसे चोरल्याचे तिने कबूल केल्याचे आव्हाड यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.

चार दिवसात तुमचे पैसे आणून देते असे तिने कबुल केले. परंतू तिने अजून पैसे आणून दिले नाही. अशी तक्रार आव्हाड यांनी केली असून तिच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारी अर्जात केली आहे.

Nashik Crime News
Kolhapur Crime: कोल्हापुरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची दादागिरी! हात पाय बांधून तरुणांना केली बेदम मारहाण; ७ जणांवर गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com