Nashik Accident News : समृद्धीवर कंटेनरच्या विचित्र अपघातात चालक जागीच ठार!

Nashik Accident News : मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गावरुन जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने पुढील कंटेनर अंडरपासच्या पुलाला अडकला.
The container fell off the bridge
The container fell off the bridgeesakal
Updated on

सिन्नर : मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गावरुन जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने पुढील कंटेनर अंडरपासच्या पुलाला अडकला. मात्र, केबिन अलग होऊन चालकासह खाली कोसळल्याने या विचित्र अपघातात लोखंडी पत्र्याचे शीट व इतर साहित्य अंगावर पडल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. ६) सकाळी आठच्या सुमारास घडली. (Nashik Accident News)

समृद्धी महामार्गाच्या सेक्शन १२ अंतर्गत गोंदे इंटरचेंज जवळच्या खंबाळे शिवारात सदर अपघात झाला. नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर कंटेनरने (क्र.एनएल-०१-एसी-४६८५) पुढे जाणाऱ्या कंटेनरला (क्र.एमएच-२०-ईएल-०९७७) पाठीमागून जोराची धडक दिली. खंबाळे-माळवाडी रस्त्यावरील अंडरपासच्या पुलावर झालेला अपघात एवढा भीषण होता की साईड बॅरिकेटिंग व संरक्षक कठड्यांना तोडत कंटेनर पुलावर अडकला.

कंटेनरची केबिन अलग होऊन थेट पुलावरुन ४० फूट अंतरावरील रस्त्यावर कोसळली. कंटेनरमधील पत्र्याचे शीट व इतर लोखंडी साहित्य देखील खाली कोसळले. हे सर्व साहित्य अंगावर पडल्याने चालकाचा मृत्यू झाला. तर पाठीमागून धडक देऊन अपघात करणाऱ्या कंटेनरने देखील संरक्षक बॅरिकेट तोडत काही अंतरावर जाऊन थांबला. सकाळची वेळ असल्याने खंबाळे-माळवाडी रस्त्यावर वर्दळची असते.

माळवाडी शिवारातील शेतकरी दूध टाकण्यासाठी खंबाळेकडे येत असतात. सुदैवाने अपघात घडला त्यावेळी अंडरपासमधून स्थानिक कोणीही प्रवास करत नव्हते. अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली. कंटेनरच्या चालकाचे शरीर अक्षरशः कापले होते. अपघाताची माहिती गोंदे इंटरचेंज येथील नियंत्रण कक्षात समजल्यावर तातडीने तेथील रेस्क्यू पथक, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे रक्षक, वावी पोलिस ठाण्यातील कर्मचारी मदतीसाठी धावले. (latest marathi news)

The container fell off the bridge
Pune Porsche Accident : अग्रवाल पिता-पुत्राच्या अडचणी आणखी वाढल्या! बांधकाम व्यावसायिकाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

अपघाताची तीव्रता पाहता शिर्डी इंटरचेंज येथील रेस्क्यू टीम देखील दाखल झाली. क्रेनच्या सहाय्याने चालकाच्या अंगावर पडलेले पत्र्यांचे शीट व इतर लोखंडे साहित्य बाजूला काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. साहित्याच्या ढिगाऱ्‍याखाली दबलेल्या चालकाला स्ट्रेचरवर ठेवताना मदत पथकातील जवानांचे देखील हात थरथरले. चालकाच्या शरीराचे अक्षरशः तुकडे झाले होते.

रुग्णवाहिकेतून चालकास दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. समी मोहमद अन्वर (वय २६, रा. लहरा, सिद्धार्थ नगर, उत्तर प्रदेश) असे मृत चालकाचे नाव आहे. सायंकाळी उशिरा त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. अपघातास कारणीभूत कंटेनर चालकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

वावीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदेश पवार, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, पाराजी वाघमोडे, हवालदार हेमंत कदम, देविदास माळी, गोंदे इंटरचेंज येथील महाराष्ट्र सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक मिलिंद सरवडे, मनोज साबळे, ज्ञानेश्‍वर हेंबाडे, रुग्णवाहिकेचे डॉ. भूषण पवार, अमोल शेळके, महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलिस उपनिरीक्षक केदारे, समाधान पाटील, दिलीप बिल्डकॉनचे व्यवस्थापक डोंगर सिंग, रेस्क्यू टीमचे रोहित चौधरी, लक्ष्मण रनशुर, राहुल डुकरे, शंकर ठोंबरे यांच्यासह स्थानिकांनी मदत कार्य केले.

The container fell off the bridge
Car Accident : चक्क हॉटेलात घुसली कार; एक गंभीर दोन जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.