Sinnar Assembly Election 2024 : कोकाटेंसमोर तगडे आव्हान

Latest Vidhan Sabha Election 2024 News : सांगळे हे शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असून ही उमेदवारी न मिळाल्यास त्यांची अपक्ष लढण्याची तयारी आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सिन्नरमध्ये खासदार असलेल्या राजाभाऊ वाजे यांची भूमिका केंद्रस्थानी असणार आहे.
Sinnar Assembly Election 2024
Sinnar Assembly Election 2024esakal
Updated on

सिन्नर मतदारसंघात सलग तीन वेळा निवडणूक जिंकणारे माणिकराव कोकाटे २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात पराभूत झाले होते. त्यानंतरच्या २०१९ च्या निवडणुकीत ते राष्ट्रवादीतून निवडणूक लढले.

शिवसेनेचे वाजे यांचा त्यांनी २०७२ इतक्या निसटत्या मतांनी पराभव केला होता. या खेपेला वाजे शिवसेना (उबाठा)कडून खासदार असून कोकाटे यांना अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र त्यांच्या विरोधात उदय सांगळे यांचे तगडे आव्हान आहे.

सांगळे हे शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असून ही उमेदवारी न मिळाल्यास त्यांची अपक्ष लढण्याची तयारी आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सिन्नरमध्ये खासदार असलेल्या राजाभाऊ वाजे यांची भूमिका केंद्रस्थानी असणार आहे. (Sinnar Assembly tough challenge for Kokate)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.