Nashik News : शहा, विंचूर दळवी उपकेंद्रात पाच मेगावॉट क्षमतेचे रोहित्र; वीज पुरवठ्यात सुधारणा होणार

Nashik News : वीज पुरवठ्यातील विस्कळितपणा सुधारण्यासाठी महावितरणाच्या शहा व विंचूर दळवी येथील ३३ / ११ केव्ही उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी पाच मेगावॉट क्षमतेचे रोहित्र बसविण्यात येणार आहे.
five megawatt power plant at Shah Vinchur Dalvi substation
five megawatt power plant at Shah Vinchur Dalvi substationesakal
Updated on

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था अद्ययावत करण्यासाठी व वीज पुरवठ्यातील विस्कळितपणा सुधारण्यासाठी महावितरणाच्या शहा व विंचूर दळवी येथील ३३ / ११ केव्ही उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी पाच मेगावॉट क्षमतेचे रोहित्र बसविण्यात येणार आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून या कामांसाठी सुमारे पाच कोटी ६८ लाख रुपये इतका निधी उपलब्ध झाला आहे. (five megawatt power plant at Shah Vinchur Dalvi substation)

सिन्नर तालुक्यातील शहा व विंचूरदळवी येथील वीज उपकेंद्रातून विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ११ केव्ही वीजवाहिनीला वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रांची क्षमता अपुरी पडू लागली असल्याने अनेकदा अतिरिक्त भारनियमन करावे लागते. त्याचा फटका शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर बसत असतो.

संबंधित भागातील शेतकरी व व्यावसायिक यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे विस्कळित वीज पुरवठा बाबत कैफियत मांडली होती. आमदार कोकाटे यांनी कामाचे प्रस्ताव बनविण्याची सूचना केली होती. त्यानुसार सादर केलेल्या प्रस्तावांना महावितरणच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडून मंजुरी मिळाली आहे.

त्यासाठीचा निधी देखील आमदार कोकाटे यांनी शासनामार्फत उपलब्ध करून घेतला आहे. लवकरच ही दोन्ही रोहित्र कार्यान्वित केली जातील व त्यामुळे वरील दोन्ही केंद्रांच्या कार्यक्षेत्रात वीजपुरवठा सुरळीत होईल. (latest marathi news)

five megawatt power plant at Shah Vinchur Dalvi substation
Nashik News : विभागीय स्तरावर वसतिगृहांसाठी 45 कोटी; मंत्री अतुल सावे यांची माहिती

शहा येथील वीज उपकेंद्रात रोहित्र बसविण्यासाठी इतर पायाभूत कामे झालेली आहेत. नवीन रोहित्रासाठी तेथे १ कोटी ३९ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. तर विंचूरदळवी येथे हे रोहित्र बसविण्याबरोबरच आवश्यक पायाभूत बाबी निर्माण करण्यासाठी ४ कोटी २५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. सिन्नर तालुक्यातील पूर्व- पश्चिम भागात प्रत्येकी ५ मेगावॉटच्या नवीन रोहित्रांमुळे वीजपुरवठा सुरळीत व पुरेशा दाबाने होण्यास मदत होणार आहे.

"पूर्व भागातील शहा व पश्चिम भागातील विंचूरदळवी वीज उपकेंद्रातून अनेकदा कमी दाबाने वीजपुरवठा व्हायचा. शिवाय अतिरिक्त भारनियमनही करावे लागत असे. यावर उपाय म्हणून शासन स्तरावरून ५ कोटी ६४ लाख रुपयांतून प्रत्येकी ५ मेगावॉटचे २ रोहित्र मंजूर करून आणले आहे. आचारसंहिता संपताच ही कामे सुरू होऊन त्रस्त वीजग्राहकांना दिलासा मिळणार आहे." - माणिकराव कोकाटे, आमदार

five megawatt power plant at Shah Vinchur Dalvi substation
Nashik Assembly Constituency : उत्तर महाराष्ट्रातील निवडणूक निकालाबाबत उत्कंठा शिगेला; कोण जिंकणार, कोण हरणार याविषयी पैजा लागल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.