सिन्नरमध्ये पुराचा कहर! उभी पिके, घरे पाण्यात; क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Sinnar Flood
Sinnar FloodSakal
Updated on

नाशिक : नाशिकमध्ये तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे गोदावरीला पूर आला आहे. त्याचबरोबर गंगापूर धरणातून ५,८८४ क्युसेकने पाणी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यातही ढगफुटीसदृश्य पावसामुळे आलेल्या पुराने कहर केला असून अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालंय. जोमात आलेले पिक पाण्यात गेल्यामुळे तोंडचा घास काढून घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आहेत.

(Sinnar Flood Latest Updates)

सिन्नर तालुक्यात रौद्ररूपी पावसानंतर आलेल्या पुरामुळे कित्येक घरे पाण्याखाली गेली असून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यामुळे हंगामातच शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावला गेलाय. यामध्ये काही हेक्टर जमीन पिकांसहित वाहून गेली आहे तर काही ठिकाणी उभ्या पिकामध्ये पाणी साचल्यामुळे पिके सडू लागलेत. त्यामुळे सिन्नरमध्ये शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला आहे.

Sinnar Flood
Nashik Flood: नाशिकला पावसाने झोडपले; गोदावरीला पूर
Sinnar Flood
अशोक चव्हाणांनी घेतली फडणवीसांची भेट; महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?

दोन दिवसापासून पूराचा जोर वाढल्यामुळे शेती वाहून गेली असून शेतमाल पूर्णपणे खराब झाला. आता यातून काहीच उत्पन्न मिळणार नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलं. तर काही नागरिकांच्या राहत्या घरात पाणी गेल्यामुळे झालेले नुकसान पाहून नागरिकांच्या डोळ्यात पाणी आलंय. काही घरांचे पूर्ण नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून दखल घेण्यात येत असून पंचनाम्याला सुरूवात झाली आहे. झालेल्या नुकसानाचे पंचनामे झाल्यावर नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे पण प्रत्यक्षात नुकसान झालेल्यांना मदत कधी मिळणार हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.

Sinnar Flood
Ashok Chavan | महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे राहणार : अशोक चव्हाण

काल सिन्नर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस पडला असून या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बाजारपेठेत पाणी घुसल्यामुळे सिन्नरमध्ये काही लोकं अडकून पडले होते. त्यांना प्रशासनाकडून बाहेर काढण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध ठिकाणी मागच्या तीन दिवसांत पावसाने हजेरी लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.