Sinnar MIDC Problems: खडकाळ, डोंगरदरीतील जागेसाठी दुप्पटीने दर! माळेगावनजीकच्‍या 390 एकर जागेच्या दराचा सुटेना तिढा, कंपन्‍यांची पाठ

Latest Nashik News : पायाभूत सुविधा शून्‍य असतानाही खडकाळ, डोंगरदरीतील जागेसाठी दामदुप्पट दर निश्‍चित केले असल्‍याने उद्योजकांनी पाठ फिरविली आहे.
Sinnar Industrial Estate Extended Area, Sinnar Industrial Estate Map & Sinnar Industrial Estate Phase 1
Sinnar Industrial Estate Extended Area, Sinnar Industrial Estate Map & Sinnar Industrial Estate Phase 1esakal
Updated on

सिन्नर : राज्‍यातील मोठमोठ्या औद्योगिक वसाहतींमध्ये आकारला जातो, तितका दर सिन्नर येथील माळेगावनजीच्‍या ३९० एकर जागेसाठी निश्‍चित केला आहे. पायाभूत सुविधा शून्‍य असतानाही खडकाळ, डोंगरदरीतील जागेसाठी दामदुप्पट दर निश्‍चित केले असल्‍याने उद्योजकांनी पाठ फिरविली आहे. दराचा तोडगा सुटल्‍यास येथे नवीन प्रकल्‍प किंवा सध्याच्‍या प्रकल्‍पांचा विस्‍तार शक्‍य होऊ शकणार आहे. (Nashik Sinnar MIDC Problems issue of price 390 acres of Malegaon land)

माळेगाव औद्योगिक वसाहतीत लहानमोठ्या एकूण बाराशे कंपन्‍या कार्यरत आहेत. यामध्ये आठ ते दहा बहुराष्ट्रीय कंपन्‍यांचा समावेश आहे. अनेक कंपन्‍या विस्‍तार करण्यास इच्‍छूक असून, नवीन कंपन्‍यांचे कारखाने उभे राहाण्याचीही शक्‍यता आहे. 'एमआयडीसी'ने अधिग्रहित केलेल्‍या ३९० एकर जागेवर विस्‍तार, नवीन कंपन्‍यांच्‍या प्रकल्‍पांची उभारणी शक्‍य आहे.

या जागेचा लेआउट झाल्यानंतरही विद्युत पुरवठा, रस्‍ते, पाणी अशा कुठल्‍याही पायाभूत सुविधा तेथे उपलब्‍ध नाहीत. त्‍यातच अवास्‍तव दरांसंदर्भात उद्योजकांकडून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत चर्चा केली होती. याबाबत सकारात्‍मक तोडगा काढण्याबाबत पवार यांनी एमआयडीसीच्‍या अधिकाऱ्यांना सूचना दिल्‍या होत्या, मात्र दराचा प्रश्‍न अद्यापही सुटलेला नाही.

उद्योजकांचे म्‍हणणे असे..

नाशिक महापालिका क्षेत्रात येणाऱ्या सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतींमध्ये प्रति स्‍क्‍वेअर मीटर ५ हजार २८० रुपयांचा दर आहे. दुसरीकडे सिन्नरच्‍या ३९० एकर जागेसाठी हा दर चार हजार ९०० रुपये निश्‍चित केला आहे. वास्‍तविक पाहता एमआयडीसीने तेराशे रुपये स्‍क्‍वेअर मीटरने जमीन अधिग्रहित केली आहे. (latest marathi news)

Sinnar Industrial Estate Extended Area, Sinnar Industrial Estate Map & Sinnar Industrial Estate Phase 1
Nashik: सिन्नर MIDCचे ग्रहण संपणार कधी? उद्योगाच्‍या स्‍वप्‍नपूर्तीत बाबूशाहीची अडकाठी; वसाहतीच्या विकासाकडे सोयीस्‍कर कानाडोळा सुरू

त्‍यामध्ये १० टक्‍के मोकळ्या जागेचे १३० रुपये, ५ टक्‍के कम्‍युनिटी स्‍पेसचे ६५ रुपये, रस्‍त्‍यासाठी १५ टक्‍के म्‍हणजे १९५, पायाभूत सुविधांसाठी २६० असा एकूण दर एक हजार ९५० रुपये प्रति स्‍क्‍वेअर मीटर होतो. त्‍यात पन्नास टक्‍के नफा पकडून पंचवीसशे रुपये दर असावा, अशी उद्योजकांची मागणी आहे.

जिल्‍ह्‍यातील वसाहतींचे दर (प्रति स्‍क्‍वेअर मीटर या दराने)

एमआयडीसी दर

अंबड ६,०७०

सातपुर ६,०७०

विंचुर २५०

माळेगाव टप्पा १ ४,९००

येवला १,०५०

जांबुटके (दिंडोरी) १,२४०

Sinnar Industrial Estate Extended Area, Sinnar Industrial Estate Map & Sinnar Industrial Estate Phase 1
Nashik Onion Rain Crisis : लाल कांद्याच्या अडीचशे हेक्टरला फटका! मालेगाव तालुक्यात परतीच्या पावसामुळे हाहाकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.