विकास गिते : सकाळ वृत्तसेवा
सिन्नर : महाराष्ट्रात असे कुठेही नाही असे सिन्नर शहरातील बस स्थानक आहे. सर्व सुविधायुक्त अतिशय अत्याधुनिक बस टर्मिनलामधील मोकळ्या जागेवर अनाधिकृतरित्या दररोज शेकडो दुचाकी आणि अनेक दुचाकी पार्क केल्या जात असल्याने या वाहनांमुळे आगाराच्या सौंदर्यात बाधा असून ही वाहने वाहक, चालकांसह आगारप्रमुखांसाठी सतत डोकेदुखी ठरत आहे. (Sinnar MSRTC Depot Illegal parking headache)
सिन्नरचे बस स्थानक आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून विमानतळाच्या पाश्र्वभूमीवर साकारण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही, एलईडी टीव्हीची सोय बस स्थानकात केली असून. हिरकणी कक्ष व पोलिस मदत कक्ष आहे. त्यातच स्वच्छतेसाठी सफाई कामगारांची नियमित फेरी असल्याने आवारात स्वच्छता कायम असते.
स्वच्छतागृह चालविण्यासाठी दिल्याने याठिकाणी कायम स्वच्छता राखली जाते. फलटांची संख्या जास्त असल्याने बसेस देखील योग्यरित्या उभ्या राहतात. सिन्नर बस स्थानकात ५९६ फेऱ्यांच्या माध्यामून प्रवाशांची वाहतूक केली जाते. तसेच हे बस स्थानक नाशिक-पुणे महामार्गावर असल्याने याठिकाणी दररोज प्रवाशांची वर्दळ असते.
नो पार्किंग झोन नावालाच
बस स्थानका समोरील नो पार्किंग झोन मध्ये अनेक नागरिक आपल्या दुचाकी तसेच चार चाकी वाहने उभी करीत असल्याने बस चालकांना व नागरिकांना या नो पार्किंग मधील वाहनधारकांमुळे अडचण निर्माण होते . तसेच बस स्थानकामधून बस चालकांना गाडी मागे घेण्यासाठी अनेकजण दुचाकी व चारचाकी गाडी बस स्थानकात आणत असल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. (latest marathi news)
शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी संख्या
सिन्नर शहरात ग्रामीण भागातून शाळा, महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या असल्याने दुपारी आणि सायंकाळी त्यांची बसस्थानकात मोठी गर्दी असते. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना बस आल्यानंतर त्यामध्ये चढण्यासाठी कसरत करावी लागते. तसेच हे बसस्थानक महामार्गावर असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासी येतात. त्यामुळे अनेकदा गर्दीचा फायदा घेत भुरट्या चोरी देखील होतात. तसेच टवाळखोर देखील याचवेळी येत असल्याने अनेकादा याचा त्रास सामन्य प्रवाशांना सहन करावा लागतो.
- एकूण ७९ बसेस
- ३४९ कर्मचारी कार्यरत
- ५४ वाहक,चालक जागा रिक्त
- डेपोतही मुबलक जागा
- बस संख्या वाढविण्याची मागणी
- अनाधिकृत पार्किंगवर कठोर कारवाईची गरज
"नाशिक येथे जाण्यासाठी बसची वाट बघावी लागते किंवा बाहेरून येणाऱ्या नाशिक बसमध्ये गर्दी असल्याने उभे राहून जावे लागत असल्याने नाशिक- सिन्नरसाठी बस वाढवाव्या जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही. हात द्या व बस थांबवा असे मागे शासनाने सांगितले होते."
- आरती रानडे, विद्यार्थी प्रवासी
"सिन्नर बस स्थानकातील ज्या काही समस्या असतील त्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आलेले असून बस स्थानकातील किंवा बस स्थानकाबाहेरील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी. वरील स्तरावर पत्र देण्यात आले असून लवकरात लवकर हे काम मार्गी लागणार आहे."
- हेमंत नेरकर, बस आगर प्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.