विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा
सिन्नर : शहरातील शिवाजीनगर, उद्योगभवन या उपनगरांप्रमाणेच पूर्व भागातील विजयनगर, खर्जे मळा, कानडी मळा, हनुमाननगर, सरस्वतीनगर, तसेच नायगाव रोडवरील रामनगरी, शिक्षक कॉलनी या उपनगरांमध्येही मूलभूत सुविधांची वानवा दिसते.
उपनगरांचा विस्तार होत आहे. नवीन-नवीन इमारती डौलाने उभारल्या जात आहेत. प्रामुख्याने नोकरी, व्यवसायनिमित्ताने येणाऱ्यांचे येथे वास्तव्य आहे. याशिवाय शिक्षणासाठी ग्रामीण भागातूनही येथे येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. (Sinnar Suburbs Problems Lack of basic facilities )