Nashik Lok Sabha Election : सिन्नरला उद्याचा आठवडे बाजार बंद!

Lok Sabha Election : सिन्नर तालुक्यातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिले असल्याची माहिती तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी दिली.
nashik Lok Sabha Election
nashik Lok Sabha Electionesakal
Updated on

सिन्नर : नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २०) मतदान होत असून या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.१९) सिन्नर तालुक्यातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिले असल्याची माहिती तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी दिली. नाशिक जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यात नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होणार आहे. (sinnar weekly market is closed for tomorrow)

त्यानुसार मतदान केंद्रावर मतदान साहित्य घेऊन मतदान पथके रविवारी रवाना होणार आहेत. सिन्नरला दर रविवारी तहसील ऑफिससमोर रस्त्यालगत आठवडे बाजार भरतो, सदर आठवडे बाजारामुळे मतदान पथके यांना मतदान केंद्रावर साहित्य घेऊन जाताना अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने रविवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आलेला असल्याचे तहसीलदार देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, सोमवारी नाशिक लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने तालुक्यात सोमवारी भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याच्या सूचना देखील श्री. देशमुख यांनी दिल्या. (latest marathi news)

nashik Lok Sabha Election
Nashik District Collector : दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर सॅटेलाईट सुविधा : जिल्हाधिकारी जलज शर्मा

सोमवारी सिन्नर कृउबा बंद

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सोमवारी (ता. २०) जिल्ह्यासह तालुक्यात सर्वत्र मतदान होणार आहे. या निवडणुकीत शेतकरी, व्यापारी, एजंट, हमाल, मापारी, माथाडी कामगार तसेच इतर संबंधित सर्व घटकांना आपले मतदान करता यावे या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समिती, सिन्नरचे संपूर्ण कामकाज बंद राहील.

तरी सर्वच घटकांनी या सूचनेची नोंद घ्यावी व मतदानाचा हक्क बजवावा असे आव्हान प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे .

nashik Lok Sabha Election
Nashik City Transport : गायकवाड सभागृह परिसरात वाहतूक बंदी! उद्यापासून अंमलबजावणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.