वावी : सिन्नर तालुक्यातील वावी शिवारात बुधवारी सायंकाळी सिन्नर शिर्डी महामार्गाच्या नियमित देखभालीचे काम करणाऱ्या कामगारांची पिकअप जीप उलटून झालेल्या अपघातात मृतांची संख्या दोन झाली आहे. अपघातात एकोणावीस जखमी झाले असून त्यात 75 वर्ष वृद्ध महिला व एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीचा देखील समावेश आहे. एका सरकारी प्रकल्पावर ज्येष्ठ नागरिक व अल्पवयीन व्यक्तीस कामगार म्हणून रोजंदारीने कामावर घेतल्याचा हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल.
सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आदेशाने रस्त्याची नियमित देखभाल करण्यासाठी एका कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. या कंट्रॅक्ट दारा मार्फत स्थानिक महिलांना रोजंदारीने कामावर घेण्यात आले होते.
कोळपेवाडी येथील अनेक महिला देखील या कामावर येत होत्या. बुधवारी सायंकाळी सुट्टी झाल्यानंतर पिकअप जीप मधून या महिला कामगार व काही पुरुष कामगार कोळपेवाडी येथे जात असताना वावी जवळच्या गुडघे पाटील पब्लिक स्कूल समोर पिकप पलटी होऊन अपघात झाला होता.
या अपघातात जीप काही मीटर अंतर रस्त्यावर घसरत गेली तसेच पाठीमागे बसलेल्या महिला कामगार रस्त्यावर व बाजूच्या नळीत फेकल्या जाऊन गंभीर जखमी झाले होत्या. सिन्नर येथे 17 महिलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर दोन महिला व एका पुरुषास नाशिक येथे हलवण्यात आले होते.
जखमी झालेल्या मंदाबाई गोपीचंद उशिरे रा. कोळपेवाडी या महिलेचा उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता तर रात्री उशिरा नाशिक येथे उपचारादरम्यान जगन राणू कोळपे रा. कोळपेवडी यांचा मृत्यू झाला. जखमींपैकी दोन महिन्यांवर नाशिक येथे तर 17 महिलांवर सिन्नर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. (latest marathi news)
पिक अप जीप मधील जखमी व मयत सर्व प्रवासी सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या देखभालीच्या कामावर रोजंदारीने येत होते. या कामगारांपैकी अनुसयाबाई झांबरे या हृदयाचे वय 75 वर्ष इतकी असून वैष्णवी हांडे ही 17 वर्षांची तरुणी देखील रोजंदारीने कामावर यायची.
संबंधितांचा जबाब घेतल्यानंतरच या महिला रोजंदारीच्या कामावर होते की नाही याबाबतचा उलगरा होईल असे पोलिसांनी सांगितले. एका शासकीय प्रकल्पात कंत्राटी पद्धतीने 75 वर्षांची वृद्ध महिला व 17 वर्षांच्या अल्पवयीन तरुणीला कामावर घेण्यात आले असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
संबंधित ठेकेदाराकडे कामावर नेमलेल्या एकाही कामगाराची नोंद नसल्याची चर्चा आहे. आठवडा भरला की अडीचशे ते तीनशे रुपये रोज या ठरलेल्या हजेरी दराप्रमाणे पगार करायचा अशी पद्धत या महिला कामगारांच्या बाबतीत असल्याचे बोलले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.