Nashik Smartcity Project : स्मार्टसिटी कंपनीचे सोळा प्रकल्प पूर्ण; 3 महिन्यात 4 प्रकल्प लागणार मार्गी

Smartcity Project : स्मार्टसिटी कंपनीकडून शहरात गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या एकूण वीस प्रकल्पांपैकी सोळा प्रकल्प पूर्ण झाले असून, चार प्रकल्प जूनअखेर पूर्ण होणार आहे.
Nashik Smartcity Project
Nashik Smartcity Projectesakal
Updated on

Nashik Smartcity Project : स्मार्टसिटी कंपनीकडून शहरात गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या एकूण वीस प्रकल्पांपैकी सोळा प्रकल्प पूर्ण झाले असून, चार प्रकल्प जूनअखेर पूर्ण होणार आहे. गावठाण पुनर्विकास, मॅकेनिकल गेट, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, तसेच गोदावरी सौंदर्यीकरण या चार प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. केंद्र सरकारने २५ जून २०१५ रोजी स्मार्टसिटी अभियानाची घोषणा केली. (nashik Sixteen projects of Smart City Company completed from last 6 years marathi news)

अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात २० सप्टेंबर २०१६ ला नाशिकची स्मार्टसिटी म्हणून निवड झाली. स्मार्टसिटी अभियानांतर्गत नाशिकमध्ये ५४ प्रकल्पांसाठी ४३८६ कोटी ७५ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला, परंतु प्रत्यक्षात स्मार्टसिटी निधीतून ११५२ कोटी ४३ लाखांचे २० प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. स्मार्टसिटी कंपनीच्या निधीतून वीस प्रकल्पांपैकी सोळा प्रकल्प पूर्ण झाले असून, चार प्रकल्प जूनअखेर पूर्ण केले जाणार आहे. स्मार्टसिटी कंपनीची मुदत जूनअखेर संपुष्टात येत आहे.

''स्मार्टसिटी कंपनीची मुदत जूनअखेर संपुष्टात येणार आहे. वीसपैकी चार प्रकल्पांचे काम या कालावधीत पूर्ण केले जाईल.''- सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी कंपनी.

पूर्णत्वास आलेले प्रकल्प

- कालिदास कलामंदिर नूतनीकरण

- महात्मा फुले कलादालन नूतनीकरण

- नेहरू उद्यान नूतनीकरण

- पंडित पलुस्कर सभागृह नूतनीकरण

- गोदावरी नदीवर पानवेली हटविण्यासाठी ट्रॅश स्किमर

- पंचवटी व नाशिक अमरधाममध्ये विद्युतदाहिनी

- दीक्षितवाडा, गोल्फ क्लब येथे जलकुंभ (latest marathi news)

Nashik Smartcity Project
Project in Himalayas : हिमालयात प्रकल्प अन् महामार्गांचा विस्तार नको ; पर्यावरणप्रेमी संघटनांचे सर्व पक्षांना साकडे, सार्वमताचीही मागणी

- स्काडा वॉटर मीटर प्रणाली

- शहरात एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावणे

- स्मार्ट स्कूल प्रकल्प

- एनर्जी ऑपरेशन सेंटर

- छत्रपती संभाजी उद्यान

- बोटिंग

- जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वार

- अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यान स्मार्ट रस्ता.

अपूर्ण प्रकल्प

- अहिल्यादेवी होळकर पुलाखाली मॅकेनिकल गेट बसविणे.

- गोदावरी घाट सौंदर्यीकरण.

- गावठाण विकास.

- सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे.

Nashik Smartcity Project
Nashik News: आचारसंहितेत अडकला Namami Goda Project; राज्य निवडणूक आयोगाकडे NMCने मागितली परवानगी

पीपीपी तत्त्वावरील पूर्ण प्रकल्प

पब्लिक बायसिकल शेअरिंग, घनकचरा व्यवस्थापन,

सीएसआरअंतर्गत पूर्ण प्रकल्प

- होळकर पुलावर रंगीतसंगीत कारंजा, इतिहास संग्रहालय, चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क, राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाखालील सुशोभीकरण.

‘कन्व्हर्जन्स’अंतर्गत प्रकल्प

- विद्युत उपकेंद्रांची क्षमता वाढ, यूजी केबल, सरकारवाडा नूतनीकरण, वॉटर ऑडिट, नेहरू बायो डाव्हर्सिटी पार्क, भालेकर हायस्कूल मैदानावरील स्मार्ट पार्किंग.

Nashik Smartcity Project
Nashik Metro Project : नाशिक मेट्रो निओचा DPR पंतप्रधान कार्यालयाकडे सादर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.