Nashik Encroachment : मालेगावातील 60 अतिक्रमणे हटविली! मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा दूर

Nashik News : मालेगाव महापालिकेने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा सुरु केली.
Employees removing encroachments with the help of JCB in ward number two of Malegaon
Employees removing encroachments with the help of JCB in ward number two of Malegaonesakal
Updated on

Nashik News : महापालिकेने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा सुरु केली. आयुक्त रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी प्रभाग समिती कार्यालय क्रमांक २ च्या कार्यक्षेत्रातील ५५ ते ६० अतिक्रमणे हटविण्यात आली. आयशानगर कब्रस्थान ते शिकारी चौकापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानांसमोर असलेले पत्राशेड. (Sixty encroachments in Malegaon were removed)

हातगाड्या, बोर्ड, लोखंडी जाळ्या, बॅनर आदी स्वरूपाचे अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले. कारवाई दरम्यान महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने अतिक्रमणधारकांचे सामान काही ठिकाणी जप्त केले. महापालिकेने पंधरा दिवसापूर्वी मोहीम सुरु केली होती. चार प्रभागात प्रत्येकी एक या प्रमाणे सलग चार दिवस मोहीम राबविण्यात आली.

यात दोनशेपेक्षा अधिक अतिक्रमणे काढण्यात आली. दरम्यानच्या काळात बकरी ईदचा सण व पावसामुळे मोहीम पुन्हा थांबली. या कालावधीत अनेक ठिकाणी काढण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाले. महापालिका प्रशासनाने पुन्हा अतिक्रमण निर्मुलन मोहीम सुरु केली आहे. काढलेले अतिक्रमण पुन्हा होणार नाही तसेच मुख्य रस्ते रहदारीसाठी मोकळे राहतील यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथे केली जात आहे. (latest marathi news)

Employees removing encroachments with the help of JCB in ward number two of Malegaon
Nashik News : वटार सर्पदंश प्रकरणी 2 डॉक्टर निलंबित; जिल्ह्यात सर्पदंशाच्या 834 लस उपलब्ध

अतिक्रमण निर्मुलन मोहीम सहाय्यक आयुक्त शाम बुरकुले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. मोहिमेत प्रभाग अधिकारी मोहम्मद इरफान मोहम्मद अशरफ, अतिक्रमण अधिक्षक भरत सावकार, अतिक्रमण पथक प्रमुख, अब्दुल कादीर, वरिष्ठ लिपिक नवल खैरनार, लिपिक शुभम बहुतकर, संजीव शिंदे, बिट मुकादम संजय जगताप, कुणाल खैरनार, रफिक शहा, शिवाजी राठोड, मोहनीष परदेशी आदींनी सहभाग घेतला.

"महापालिका हद्दीत सध्या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढली जात आहे. रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे." - रवींद्र जाधव, आयुक्त, मालेगाव मनपा

Employees removing encroachments with the help of JCB in ward number two of Malegaon
Nashik Assembly Election : विधानसभेच्या निवडणुकीत बूथची संख्या वाढणार; पारंपरिक केंद्रही ठरणार कालबाह्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.