Nashik Adivasi Morcha : ‘आदिवासीं’च्या मोर्चाने स्मार्ट रोड जाम! अशोकस्तंभ येथे वाहतूक कोंडी

Adivasi Morcha : मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मुक्कामी असल्याने स्मार्ट रोडवर ‘चक्काजाम’ झाला आहे.
Adivasi Morcha at Nashik
Adivasi Morcha at Nashikesakal
Updated on

Nashik Adivasi Morcha : वनहक्क कायद्यानुसार जमीन कसणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर लावण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी नाशिक शहरात धडकलेल्या आदिवासींच्या मोर्चाने (Adivasi Morcha) शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. तर, मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मुक्कामी असल्याने स्मार्ट रोडवर ‘चक्काजाम’ झाला आहे. या मोर्चामुळे मेहर सिग्नल आणि अशोकस्तंभ चौकात वाहतूक कोंडी झाली होती. (Nashik Adivasi Morcha marathi news)

भारतीय ट्रेड युनियन केंद्र (सिटू), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) यांच्या वतीने कामगार व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार जे.पी. गावित, डॉ. डी.एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांचा मोर्चा सोमवारी (ता.२६) दुपारी शहरात धडकला.

दिंडोरी रोड, पेठरोड, मुंबई आग्रा महामार्ग, त्र्यंबकरोडने आंदोलक मोर्चेकरू शहरात दाखल झाले. यामुळे या मार्गांवरील वाहतूक ठिकठिकाणी खोळंबली होती. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर मेहेर सिग्नलकडून सीबीएस सिग्नलकडे व सीबीएस सिग्नलकडून मेहेर सिग्नलकडे येणारी वाहतूक पोलिसांनी बंद केली. तसेच, ही वाहतूक पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली. .

महात्मा गांधी रोडकडून मेहेर सिग्नलमार्गे अशोकस्तंभाकडे वाहतूक वळविली गेली. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त आनंदा वाघ यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले.

या वाहतूक कोंडीमुळे अशोकस्तंभ चौकात वाहतूक कोंडी झाली. याच वाहतूक कोंडीचा फटका शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहनेही अडकली होती. यानंतर वाहतूक शाखेने अशोकस्तंभाकडे येणारी वाहतूक पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली. (Latest Marathi News)

Adivasi Morcha at Nashik
Ulhasnagar News : जेलमध्ये असणारे आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी राजकारणात ऍक्टिव्ह

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

शहरात हरसूल, पेठ, दिंडोरी, कळवण, मालेगाव, इगतपुरी, त्र्यंबक, सुरगाणा तालुक्यातून वेगवेगळ्या मार्गांनी पायी मोर्चा नाशिकमध्ये दाखल झाल्याने या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला. सकाळी आठ वाजेपासून मोर्चा मार्गांवर फिक्स पॉइंट नेमण्यात आले.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त आनंदा वाघ, सरकारवाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, मुंबई नाक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की, गंगापूरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण चव्हाण यांच्यासह सहायक उपनिरीक्षक, उपनिरीक्षकांसह पोलीस अंमलदार असा सुमारे ५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात होता. राखीव दलाच्या तुकडीसह शीघ्रकृती दलाची तुकडीही तैनात केली आहे. 

Adivasi Morcha at Nashik
Shivajinagar News : जरांगेंना बदनाम करणारे राणेंचे कार्यकर्ते; जरांगेंच्या विरोधात बोलण्यासाठी फोन येत आसल्याची वकिलांची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()