नाशिक : जलसंपदा विभागाकडे उपलब्ध असलेल्या जलाशयाचा पृष्ठभाग व मोकळ्या जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. राज्यातील सर्व उच्च आणि अतिउच्च दाब उपसा जलसिंचन योजनांचे सौरऊर्जीकरण करण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे. या निर्णयानुसार सौरऊर्जा प्रकल्पासाठी लागणारी आवश्यक जमीन जलसंपदा विभागाने महावितरण कंपनीस हस्तांतरित करावयाची आहे. (Solar power generation through water resources Mahavitran)