Nashik News : वाहेगावसाळच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; तेजस आहेर यांना अखेरचा निरोप

Nashik : चांदवड तालुक्यातील वाहेगाव साळ येथील लष्करी जवान तेजस जयवंत गांगुर्डे यांचे मनमाड नजिक नागापूर येथे दुचाकी अपघातात निधन झाले.
cremation
cremationesakal
Updated on

Nashik News : चांदवड तालुक्यातील वाहेगाव साळ येथील लष्करी जवान तेजस जयवंत गांगुर्डे यांचे मनमाड नजिक नागापूर येथे दुचाकी अपघातात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर हजारो गावकऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. २३) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करुन अखेरचा निरोप देण्यात आला. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव सजलेल्या वाहनातून अंत्यसंस्कारस्थळी आणण्यात आले. यावेळी ‘अमर रहे अमर रहे, तेजस आहेर अमर रहे’, व ‘भारत माता की जय, वंदे मातरम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. (soldier Tejas Jaywant Gangurde died in accident near Manmad )

वडिलांच्या निधनाला वर्षही पूर्णही होत नाही, तोच घरातील कर्त्या मुलाचे निधन झाल्याने आहेर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वाहेगाव साळ येथील जवान तेजस जयवंत आहेर (वय३२) यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन २०१२ मध्ये देवळाली येथे सैन्यदलात भरती झाले. सध्या ते २६८ रेजिमेंट भटिंडा पंजाब येथे कार्यरत होते. चाळीसगाव येथे नवीन घर घेतल्याने साहित्य स्थलांतरीत करण्यासाठी ते नुकतेच सुटीवर आले होते.

दरम्यान, सोमवारी (ता.२२) कामानिमित्त लासलगावहून चाळीसगावनजिक सासुरवाडी असलेल्या वाडी गुडी या गावी दुचाकी (क्र. एमएच ५४ ए ४६४) या दुचाकीवरुन जात असताना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला मनमाडनजिक नागापूर येथे अपघात झाला. त्यात ते जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी मालेगाव शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (latest marathi news)

cremation
Nashik News : बॉश कंपनीची याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली

त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी भाग्यश्री, मुलगी आरोही (६) व मुलगा आदित्य(४) असा परिवार आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान त्यांचे पार्थिव वाहेगाव साळ येथे आणण्यात आले. गावात ठिकठिकाणी सडा -रांगोळी काढल्या होत्या. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले होते. त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी .घराजवळ ठेवण्यात आले होते. यावेळी आई, पत्नी व मुलांनी फोडलेल्या हंबरड्याने उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.

तरुणांनी व शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाच्या सहभागाने गावातून त्यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढून लाडक्या जवानाला अलविदा केले. अंतिम दर्शनानंतर फुलांनी सजवलेल्या रथातुन अंत्ययात्रा काढण्यात आली. स्मशानभूमी लगत असलेल्या शासकीय जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देवळाली येथील सैन्य दलाच्यातुकडीने व पोलीस विभागाच्या तुकडीने बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. यावेळी त्यांच्या पत्नी भाग्यश्री यांच्याकडे सैन्य दलाच्या अधिकाऱ्याने तिरंगा स्वाधीन केला .

यावेळी तहसीलदार मंदार कुलकर्णी, आमदार राहुल आहेर, पोलीस निरीक्षक कैलास वाघ, प्रहारचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर, निफाड पं. स. सदस्य शिवा सुराशे, चांदवड पं. स. माजी सभापती नितीन गांगुर्डे ,भाजपाचे तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, माजी सैनिक संघटनेचे तालुकाप्रमुख बाळु गाडे, बाळासाहेब ठाकरे आदींनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. मुलगा आदित्य, मुलगी आरोही आणि पत्नी भाग्यश्री यांनी पार्थिवाला अग्नीडाग दिला. अंत्यसंस्कारप्रसंगी पंचक्रोशीसह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

cremation
Nashik News : रायगड चौकात गढूळ, अळीयुक्त पाणीपुरवठा; नागरिकांकडून तीव्र संताप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.